मुंबई

शाहुवाडीत विकासकामांची पाहणी

CD

टिटवाळा, ता. ११ (वार्ताहर) : कल्याण पंचायत समितीअंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या मूल्यांकन समितीचा शाहुवाडी तालुका दौरा उत्साहात पार पडला. ग्रामविकासातील नाविन्यपूर्ण उपक्रम, लोकसहभाग आणि पारंपरिक संस्कृतीच्या अनोख्या स्वागताने समिती सदस्य भारावून गेले होते. समितीप्रमुख तथा गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या दौऱ्यात विस्तार अधिकारी पराग भोसले, आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी मोहन गायकवाड यांचा समावेश होता. ठाणे
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा झाला. दौऱ्यादरम्यान प्रत्येक गावात समितीच्या स्वागतासाठी उत्सवी वातावरण पाहायला मिळाले. आकर्षक रांगोळ्या, पारंपरिक सजावट, हलगी-घुमक्यांचा गजर आणि लेझीम सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी समितीच्या स्वागतासाठी घेतलेली मेहनत विशेष लक्षवेधी ठरली.
शाहुवाडी तालुक्यातील सुपात्रे, डोणोली, सावे, वेरेवाडी, बांबवडे, पिशवी, कडवे, आकुर्ले, शिरगाव, नेर्ले, कोतोली, सोनवडे, भाडळे, मानोली, ऐनवाडी, येळवण जुगाई, नांदारी, कुंभवडे, घुंगुर, पेंडाखळे, शिवारे आणि साळशी अशा २२ ग्रामपंचायतींची समितीमार्फत तपासणी करण्यात आली. यावेळी प्रशासन, नागरी सुविधा, तक्रार निवारण, करवसुली, पाणीपुरवठा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, शाळा, अंगणवाडी आणि स्मशानभूमी आदी विकासकामांची पडताळणी करण्यात आली.

पुरस्कारासाठी चुरशीची स्पर्धा
पाहणीदरम्यान काही ग्रामपंचायतींचे नाविन्यपूर्ण उपक्रम विशेष चर्चेत राहिले. ऐनवाडी धनगरवाडी येथील रेशीम उद्योग, सुपात्रे ग्रामपंचायतीचा गणेशमूर्ती दान उपक्रम, पिशवी गावातील लोकाभिमुख कामे; तसेच येळवण जुगाईचे दप्तर व्यवस्थापन यामुळे समिती प्रभावित झाली. साळशी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी घेतलेले निर्णयही कौतुकाचा विषय ठरले. विशेष म्हणजे साळशी, ऐनवाडी आणि सुपात्रे ग्रामपंचायतींमध्ये पुरस्कारासाठी चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. विकासकामे, पारदर्शक प्रशासन आणि लोकसहभागाच्या जोरावर प्रत्येक ग्रामपंचायतीने समितीवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट ! सियाला केतनसोबत लोहगडावर जायचे नव्हते, पण... आईचा मोठा दावा

Music Benefits: गाण्यामुळे मनाला का मिळते एवढी शांतता ? जाणून घ्या,'म्युझिक थेरपी'मागचं विज्ञान...

Wilson Point Mahabaleshwar : पर्यटकांच्या 'या' कृत्यामुळे महाबळेश्वरचा विल्सन पॉइंट आता सूर्यास्तानंतर राहणार पूर्णपणे बंद; पाळीव प्राण्यांनाही नो-एन्ट्री!

Hinjewadi Metro: प्रवाशांना मोठा दिलासा! हिंजवडी मेट्रो प्रवाशांसाठी चौदा मार्गांवर बससेवा; दोन कंपन्यांशी करार, पहिल्या टप्प्यात २० बस

Accident News: एका क्षणात संपलं सगळं! संभाजीनगरातील चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर, चार व्यावसायिकांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT