लाकडी दांडक्याने जीवघेणी मारहाण
भावाच्या मृत्यूप्रकरणी कासा पोलिस ठाण्यात गुन्हा
कासा, ता. ११ (बातमीदार) ः मूलबाळ होत नसल्याने दवाखान्यात जाऊन तपासणी करण्याचा सल्ला देणाऱ्या भावाची सख्ख्या भावाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार डहाणू तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरारी आहे.
मयत बारक्या बोंगे (वय ५२), सीताराम बोंगे (वय ४८) दोघे भाऊ बेडगाव बोंगेपाडा, पो. मोडगाव, ता. डहाणू येथील रहिवासी आहेत. बारक्या बोंगे भावाला मूलबाळ नसल्याने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा आग्रह करत होते. या गोष्टीचा राग आल्याने शनिवारी (ता. ९) संध्याकाळी ७ च्या सुमारास सीताराम बोंगेने भावाला लाकडी दांडक्याने मारहाण होती. या मारहाणीत बारक्या बोंगे यांना जबरी दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या पार्वती बारक्या बोंगे (वय ५५) यांच्या तक्रारीवरून कासा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार कासा पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ९९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) व ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.