मुंबई

महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

CD

महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

वसई, ता. ११ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेतील पाच कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नवघर-माणिकपूर विभागीय कार्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी महापौर नारायण मानकर यांनी कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत सेवानिवृत्तीनंतर आरोग्य जपण्याचा सल्ला दिला.

ग्रामपंचायत, नगर परिषद आणि महापालिकेतील कर्मचारी शहराच्या स्वच्छता व आरोग्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. नागरिकांच्या हितासाठी त्यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे, असे मानकर यांनी सांगितले. या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त सुरेश पाटील, माजी सभापती संदेश जाधव, भरत गुप्ता, माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, नगरसेवक कल्पेश मानकर, नगरसेविका प्रमिला पाटील तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेचे लेखाधिकारी संजय आप्पा पाटील, अधीक्षक संजय नरेंद्र पाटील, वरिष्ठ लिपिक जगदीश महिडा, वाहनचालक हरेश पाटील आणि सफाई कामगार चतुर हरिजन हे कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले. त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

माजी सभापती संदेश जाधव यांनी कर्मचाऱ्यांचे शहर विकासातील योगदान अधोरेखित केले, तर भरत गुप्ता यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक कार्यपद्धतीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त कर्मचारी नरेंद्र मानकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Shortage: नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर सरकारचे मोठे स्पष्टीकरण; पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाची माहिती समोर

'प्रेम कायम...' विजय यांच्या शपथविधीनंतर त्रिशा कृष्णनची पोस्ट चर्चेत, कॅप्शनमध्ये लिहलं...'प्रेम श्रेष्ठ असतं'

ICC ODI Ranking : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रतेसाठी चढाओढ; टीम इंडियासाठी महत्त्वाची बातमी... पाकिस्तानला धक्का, बांगलादेश पुन्हा ICC स्पर्धेला मुकणार

Latest Marathi News Live Update: TCS प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी

Nashik News : कुशावर्ताचे पाणी होणार स्वच्छ, निर्मळ अन्‌ निर्जंतुक; कुंभमेळा प्राधिकरणाचा विश्‍वराज फाउंडेशनसोबत सामंजस्य करार

SCROLL FOR NEXT