मुंबई

त्या अधिकाऱ्याचे तत्काळ निलंबन करावे

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : नौपाडा प्रभाग समितीअंतर्गत एका स्टाॅलवर कारवाई करत अपंग महिलेची व्हीलचेअर जप्त केल्याचा आरोप उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आला. दिव्यांग महिलेची व्हीलचेअर जप्त करणाऱ्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी; अन्यथा संबंधित प्रभागातील अनधिकृत बांधकामे अधिकाऱ्यांना व्हीलचेअरवर बसवून दाखविण्यात येतील, असा आक्रमक इशारा महेश कदम यांनी दिला आहे.
ठाणे शहरातील नौपाडा भागात अतिक्रमण विभागाने नुकतीच कारवाई केली. यामध्ये एका अपंग महिलेच्या स्टाॅलवर कारवाई करत व्हीलचेअर जप्त केली. हा प्रकार माध्यमांनी उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाने व्हीलचेअर परत केल्याचे ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि महानगरप्रमुख महेश कदम यांनी सांगितले. यानंतर पालिका मुख्यालय गाठत आंदोलन करीत कारवाईविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनानंतर केदार दिघे आणि महेश कदम यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे नवे उपायुक्त जितेंद्र मुकादम यांना भेटून एक निवेदन दिले. निवेदनात प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका करत, नव्या नियुक्तीचे अभिनंदन आणि प्रशासनाच्या ‘अपंग’ संवेदनशीलतेचा जाहीर पंचनामा, असा उपरोधिक टोला लगावण्यात आला आहे. नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासनाने माणुसकी गमावली असून एका हतबल महिलेच्या जगण्याचा आधार हिरावून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. माध्यमांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतरच प्रशासनाने ती व्हीलचेअर परत केल्याचा दावाही करण्यात आला आहे.

कारवाईवर टीका
ठाण्यातील अनधिकृत बांधकामे आणि कथित घुसखोरांवरील कारवाईवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कॅमेऱ्यासमोर हातोडा चालतो आणि नंतर पुन्हा अनधिकृत बाजार भरतो, असा रोष व्यक्त करत ही कारवाई केवळ दिखाव्यासाठी होत असल्याची टीका पत्रातून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT