मुंबई

सीबीडीत ध्वनी प्रदूषणाविरोधात नागरिक आक्रमक

CD

तुर्भे, ता. ११ (बातमीदार) : सीबीडी बेलापूर परिसरातील वाढते ध्वनिप्रदूषण आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आता ऐरणीवर आला असून, याविरोधात नागरिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. ‘सजग नागरिक मंच’ आणि ‘सारथी’ या सामाजिक संस्थांनी नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांची भेट घेत सविस्तर निवेदन सादर केले. सायन-पनवेल महामार्गालगत ध्वनी प्रतिबंधक भिंती उभारणे तसेच कोकण भवन परिसरात भुयारी पादचारी मार्ग उभारण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, याच विषयावर जुलै २०२५ मध्ये महापालिका आयुक्तांकडे निवेदन देण्यात आले होते; मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही अथवा प्रतिसाद न मिळाल्याने अखेर नागरिकांनी थेट महापौरांकडे धाव घेतली आहे.

निवासी भागाच्या दिशेने उड्डाणपुलालगत सुमारे सहा मीटर उंचीच्या ध्वनीशोषक धातूंच्या ‘नॉईज बॅरिअर’ उभारण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या ध्वनी प्रतिबंधक भिंती अनेक महानगरांमध्ये यशस्वी ठरल्या असून, नवी मुंबईतही त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

महामार्गावरील आवाजामुळे नागरिक त्रस्त

सायन-पनवेल महामार्गावर दिवसरात्र सुरू असलेली अवजड वाहनांची वाहतूक आता बेलापूरमधील निवासी भागांसाठी मोठा त्रास ठरत आहे. महामार्गालगतच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सततच्या कर्णकर्कश आवाजाचा सामना करावा लागत असून, ध्वनिप्रदूषणाची पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांपेक्षाही अधिक असल्याचा दावा संस्थांनी केला आहे.

कोकण भवन परिसरात पादचाऱ्यांचा जीव धोक्यात

कोकण भवन परिसरातील महामार्ग आणि सीबीडी फायर ब्रिगेड परिसराला जोडणारा रस्ता नागरिकांसाठी धोकादायक ठरत असल्याचेही संस्थांनी निदर्शनास आणून दिले. या ठिकाणी वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग नागरिकांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

जनतेच्या करातून जमा होणारा पैसा हा नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि जीवनमान सुधारण्यासाठी वापरला गेला पाहिजे. ध्वनी प्रतिबंधक भिंती, सुरक्षित पादचारी मार्ग आणि मूलभूत सुविधा हीच खरी स्मार्ट सिटीची ओळख आहे, असे संस्थांनी स्पष्ट केले.

करदात्या नागरिकांचा पैसा अनावश्यक कामांवर खर्च न करता प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी डोळसपणे निर्णय घ्यावेत. गटर- मीटर- वॉटर या संकुचित कार्यपद्धतीतून बाहेर पडत जनतेच्या सोयीसुविधांसाठी निधी वापरणे आवश्यक आहे.
- अरुण कागले, सदस्य, सजग नागरिक मंच, नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT