मुंबई

मुलीच्या लग्नात बापाचे निधन,मोखाड्यातील हृदयद्रावक घटना

CD

लग्नकार्यातील दगदग भोवली
मोखाड्यात मुलीच्या लग्नापूर्वीच वडिलांचे निधन
मोखाडा, ता. ११ (बातमीदार)ः वडिलांचे प्रेम मुलीसाठी आयुष्यभर हवेच असते. कारण तिच्या लग्नात अक्षदा टाकणारा बाप हीच तिची मोठी ताकद असते. मात्र, मोखाड्यातील दत्तात्रय उबाळे (६०) यांचा तिसऱ्या मुलीच्या लग्नसोहळ्याच्या दिवशी दिवसभराच्या धावपळीमुळे मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना घडली आहे.
तहसील कार्यालयात नोकरीला असलेले दत्तात्रय उबाळे (६०) यांच्या तिसऱ्या मुलीचा हळदीचा कार्यक्रम शनिवारी ९ मे रोजी जोरात पार पाडला. १० मे रोजी दुपारी तिचे लग्न होते. मात्र, त्याआधीच ११ वाजता अस्वस्थ वाटू लागल्याने दत्तात्रय उबाळे यांना मोखाड्यात प्राथमिक उपचारानंतर नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. लग्नमंडपात ही बातमी पसरली होती. मात्र, सर्व पाहुणे जमले असल्याने लग्न थांबवणे उचित नसल्याने वडील उपचार घेत असल्याचे सांगत कार्य पार पाडण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, मुलीच्या लग्नाच्या तयारीसाठी उबाळे यांची महिनाभरापासून लगबग सुरू होती.
--------------------------------
आनंदाच्या क्षणांवर विरजण
उशिरापर्यंत नवरी मुलीला याबाबतची कल्पना देण्यात आली नव्हती. लग्नकार्य थांबविण्यापेक्षा लवकरच उपचार करून घरी परत येतील, अशी समज सर्व नातेवाइकांनी दिल्याने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास लग्नकार्य पार पाडले, पण दुपारी ३ वाजता वडिलांच्या निधनाच्या वृत्ताने आनंदाचे क्षण दुःखात बदलल्याने लग्नमंडपातील नातेवाईक तसेच पाहुण्यांना अश्रू अनावर झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT