चाणजे ग्रामपंचायत हद्दीत डेंगीचा शिरकाव
एका तरुणीचा मृत्यू; प्रशासन सतर्क
उरण, ता. ११ (बातमीदार) ः उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीत डेंगीच्या साथीने डोके वर काढले आहे. डाऊर नगर येथील एका २२ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या परिसरात डेंगीचे इतर संशयित रुग्णही आढळले असून, या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. वाढता धोका लक्षात घेता आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
चाणजे ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३० ते ३५ हजारांच्या घरात आहे. या भागात पाणीपुरवठा अपुरा होत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक करतात. उघड्यावर साठवलेल्या या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याचे समोर आले आहे. त्यातच पावसाळा तोंडावर असतानाही ग्रामपंचायतीने नालेसफाई, गटारे उपसणे किंवा औषध फवारणी याकडे दुर्लक्ष केल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. परिणामी, गेल्या १५ दिवसांत गावात डेंगीचे तीन रुग्ण आढळले असून, यातील एका २२ वर्षीय तरुणीचा ८ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य चार संशयितांवर खासगी व सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चाणजे ग्रामपंचायत हद्दीत डेंगीचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागामार्फत पथक नेमले असून, घरोघरी सर्व्हेद्वारे नमुने घेतले जात आहेत. तसेच, परिसरात ग्रामपंचायतीमार्फत फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, पाणी साठवून उघडे न ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. चाणजे ग्रामपंचायतीत तातडीने साफसफाई करण्याकडे लक्ष केंद्रित केले असून, ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये.
- वंदन कुमार पाटील, तालुका आरोग्य अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.