मुंबई

पावसाळ्यापूर्वी धोकादायक बांधकामांचे परीक्षण होणार

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूल, साकव आणि जुन्या इमारतींचे परीक्षण करावे, तसेच धरणांची प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक अहवाल सादर करण्याच्या सूचना ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह जलसंपदा विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मॉन्सूनपूर्व तयारी आढावा बैठक समिती सभागृहात पार पडली. या वेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सूचना दिल्या.

आगामी पावसाळ्यात जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी आतापासूनच सतर्क राहून समन्वयाने पूर्वतयारी करावी. जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा चोख असावा आणि आपत्कालीन स्थितीत तत्काळ मदतीसाठी ‘आपदा मित्रां’ची संख्या वाढवावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी पांचाळ यांनी दिले आहेत. या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रमुख घाटांमध्ये कायमस्वरूपी व्यवस्था
राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने माॅन्सून काळात दरडी कोसळण्याच्या घटना लक्षात घेऊन प्रमुख घाटांमध्ये जेसीबी, पोकलेन आणि डम्परची कायमस्वरूपी व्यवस्था अशा सूचना करीत, आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांची गतिशीलता तपासण्यासाठी अग्निशमन दल, पोलिस आणि आरोग्य विभागाने प्रत्येक तालुक्यात रंगीत तालीम घ्यावी, असे निर्देश दिले.

साधनसामग्रीसाठी अनुदान देणार
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने औषधसाठा आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवावीत, आपत्ती निवारणासाठी आवश्यक साधनसामग्रीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून अनुदान उपलब्ध करून दिले जाईल, असे स्पष्ट केले. तसेच दरडप्रवण गावे, पूरप्रवण क्षेत्रे, नदीतील गाळ काढणे, औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा आणि शोध-बचाव साहित्याची उपलब्धता यांचा सविस्तर आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR 4 Rule: करदात्यांसाठी मोठा नियम! ITR-4 फाइल करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा बदल; फ्रीलान्सर आणि छोट्या व्यावसायिकांना धक्का

ICC ODI Ranking : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रतेसाठी चढाओढ; टीम इंडियासाठी महत्त्वाची बातमी... पाकिस्तानला धक्का, बांगलादेश पुन्हा ICC स्पर्धेला मुकणार

Latest Marathi News Live Update: TCS प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी

Leopard Rescue : विहिरीत पडलेल्या बिबट मादीला वनविभागाने केले रेस्क्यू

IPL 2026 Controversy : टीम डेव्हिडवर बंदीची कारवाई? RCB vs MI सामन्यात नको ते करून बसलाय... Viral Video ची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

SCROLL FOR NEXT