मुंबई

एचपीकडून कामाच्या भविष्यासाठी भारतात २० पेक्षा अधिक उत्पादने आणि उपाययोजनांचे अनावरण

CD

‘एचपी’च्या उत्पादनांची नवी श्रेणी भारतात सादर

नवी दिल्ली, ता. ११ : एचपी इंडियाने सोमवारी (ता. ११) वैयक्तिक प्रणाली, प्रिंट आणि कर्मचारीवर्गासाठीच्या सोल्यूशन्सचा समावेश असलेल्या २० हून अधिक नवीन उत्पादने आणि सोल्यूशन्सची एक व्यापक श्रेणी भारतात सादर केली. ही श्रेणी विद्यार्थी ते व्यावसायिक आणि उद्योगांपर्यंत भारताच्या विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

एचपीच्या नवीन श्रेणींमध्ये ‘ओम्निपॅड १२’ समाविष्ट असून ते विद्यार्थी आणि प्रथम वापरकर्त्यांसाठी टॅब्लेटची लवचिकता आणि ‘पीसी’सारखी (संगणक) उत्पादकता आणते. तसेच, एचपी एलिटबोर्ड जी१ए नेक्स्ट जेन एआय पीसीदेखील बाजारात आला असून तो आधुनिक कार्यस्थळांसाठी शक्तिशाली, पोर्टेबल आणि सुलभ संगणकीय अनुभव देण्यासाठी तयार केलेला जगातील पहिला आणि एकमेव एआय कीबोर्ड पीसी आहे. एचपी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक इप्सिता दासगुप्ता यांनी सांगितले, की ‘भारताच्या विकासाच्या प्रवासात लोकांचे शिक्षण, कमावण्याची पद्धत आणि नवनिर्मिती यासाठी तंत्रज्ञान अविभाज्य आणि केंद्रस्थानी आहे. देशातील तंत्रज्ञानाचा स्वीकार पाहिल्यास लोक खूप वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. काहींसाठी याची सुरुवात थेट तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेपासून होते. तर इतरांसाठी त्याचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी आत्मविश्वास आणि कौशल्ये निर्माण करणे महत्त्वाचे आहे.’ एचपी सोल्यूशन्स विभागाचे वरिष्ठ संचालक संजीव पाठक यांनी सांगितले, की ‘भारतातील उद्योगांमध्ये एआय आणि तंत्रज्ञानावर आधारित कार्यप्रवाहांना गती मिळत आहे आणि एआय प्रशिक्षित अभियंते, डिझाइनर, डेव्हलपर आणि एआयद्वारे सक्षम उद्योगांवरील मागण्या वेगाने वाढत आहेत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT