आर्थिक गुन्ह्यांची राजधानी मुंबई!
एनसीआरबीच्या अहवालात धक्कादायक वास्तव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः संपूर्ण देशात सर्वाधिक आर्थिक फसवणुकीचे प्रकार, घोटाळे मुंबईत घडतात, ही स्पष्ट करणारी आकडेवारी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने ताज्या अहवालात जारी केली.
विशेष म्हणजे, या आकडेवारीनुसार एकीकडे दिल्ली, लखनऊ, गाझियाबाद, कानपूर, इंदूर आदी शहरांमध्ये आर्थिक गुन्ह्यांची संख्या कमी करण्यात यश आलेले असताना मुंबईत मात्र आदल्या वर्षाच्या तुलनेत नोंद गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
ब्युरोने २०२४ वर्षात देशातील १९ महानगरांमध्ये घडलेल्या विविध प्रकारातील गुन्हे प्रकारांची आकडेवारी आणि विश्लेषण अहवालाद्वारे जारी केले आहे. त्यानुसार १९ महानगरांमध्ये आर्थिक फसवणूक, फौजदारी विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करून घोटाळा आदी ४२,७४७ गुन्हे नोंदवण्यात आले. त्यापैकी ७,७७१ गुन्हे मुंबईत दाखल आहेत. २०२३ मधील गुन्ह्यांशी तुलना केल्यास २०२४ मध्ये १,२०७ गुन्हे वाढले आहेत.
या आकडेवारीनुसार महानगरांमध्ये १,५२७ गुन्हे वाढले, तर मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये मिळून २,१२३ गुन्ह्यांची वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव ब्युरोने समोर ठेवले.
फसवणुकीच्या उद्देशाने फौजदारीपात्र विश्वासघात या प्रकारात मुंबईत सर्वाधिक १,३९५ गुन्हे नोंद झाले. त्या खालोखाल दुसरा क्रमांक लखनऊ शहर (४८२) आणि तिसरा क्रमांक सुरत (३१२) शहराचा लागतो. बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक, घोटाळ्यांचे मुंबईत ६,३६६, हैदराबादमध्ये ५,६७९, जयपूर ५,२६८ गुन्हे नोंद झाले आहेत.
कोटींच्या फसवणुकीची प्रकरणे अधिक
मुंबईत नोंद झालेल्या ७,७७१ आर्थिक गुन्ह्यांपैकी ३५८ प्रकरणांमध्ये फसवणूक किंवा घोटाळ्याची रक्कम एक ते १०० कोटींच्या दरम्यान आहे. चार प्रकरणांमधील रक्कम १०० कोटींच्या पुढे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.