मुंबई

११० हेक्टर जागा अतिक्रमण मूक्त

CD

११० हेक्टर जागा अतिक्रमणमुक्त
सिडकोने दोन वर्षांत सुमारे सहा हजार बांधकामे पाडली
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ : महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या आड येणारी बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याचे मोठे काम सिडको महामंडळाने केले आहे. गेल्या दोन वर्षांत तब्बल पाच हजार ८०० बांधकामे भुईसपाट करण्यात सिडकोला मोठे यश आले आहे. ही बांधकामे पाडल्यामुळे तब्बल ११० हेक्टर जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली असून, शहराने मोकळा श्वास घेतला आहे.
नवी मुंबई परिसरात सिडकोमार्फत एरोसिटी, एज्युकेशन सिटी, मेडिसिटी, इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क, लॉजिस्टिक पार्क, एंटरटेन्मेंट अरेना, मेट्रो आणि नैना क्षेत्रातील विविध पायाभूत प्रकल्पांची अंमलबजावणी प्रगतिपथावर आहे. विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन मोहिमा या महत्त्वपूर्ण प्रकल्पांशी संलग्न केल्या आहेत. नवी मुंबईच्या जागतिक दर्जाच्या विकासामध्ये कोणतेही अनधिकृत बांधकाम अडथळा ठरू नये, यासाठी संबंधित प्रकल्पांसाठी राखीव जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याची कारवाई अधिक तीव्रतेने करण्यात येत आहे. सिडकोतर्फे या प्रकल्पांच्या जमिनींवर निष्कासन मोहिमा अधिक व्यापकपणे राबविण्यात येत असून, हे क्षेत्र अतिक्रमणमुक्त करून प्रकल्प नियोजित वेळेत अंमलबजावणी होणे सुनिश्चित करण्यात येत आहे. प्रकल्पांच्या अंमलबजावणीपुरतेच सिडकोचे प्रयत्न मर्यादित नसून भविष्यातील विकासाच्या दृष्टीने भूसंपदेचे संरक्षण व संवर्धन करणे हेही तितकेच महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. यासाठी अतिक्रमणमुक्त करण्यात आलेल्या जमिनींवर मोठ्या प्रमाणावर संरक्षक कुंपण उभारण्यात आले असून, पुनः अतिक्रमण रोखण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. तसेच या जमिनींचा त्वरित लिलाव करण्यात येऊन त्यांचा उपयोग करण्याचे सुनिश्चित केला जात आहे. खारघर-तुर्भे लिंक रोड प्रकल्पातील अडथळा ठरणाऱ्या झोपड्यांचे झोपडीधारकांसोबत समन्वय साधून निष्कासन करण्यात आले. तसेच सिडकोच्या जमिनीवर अवैधरित्या मलबा टाकणे व माती चोरी प्रकरणी डंपर, ट्रक, जेसीबी व पोकलेन चालकांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

नैनामध्येही कामाला सुरुवात
नैना क्षेत्रामध्येही संपूर्ण परिसराचा नियोजित विकास सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर नोटिसा बजावण्यात आल्या असून, निष्कासन मोहिमा राबविण्यात आल्या. तसेच, अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची कारवाई करण्यात आली असून, त्यामुळे विस्तारित नवी मुंबई परिसरातील शिस्तबद्ध व नियोजित विकासाला अधिक बळ प्राप्त झाले आहे.

सार्वजनिक जमिनींचे संरक्षण करणे आणि नवी मुंबईचा जागतिक दर्जाच्या नियोजित शहर म्हणून विकास करणे, यासाठी सिडको कटिबद्ध आहे. अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात राबविण्यात आलेली व्यापक कारवाई ही बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधातील सिडकोची ठाम भूमिका अधोरेखित करते. अतिक्रमित जमीन मुक्त झाल्यामुळे एरोसिटी, एज्युकेशन सिटी, मेडिसिटी, लॉजिस्टिक पार्क, एंटरटेन्मेंट अरेना आदी महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या उभारणीच्या दृष्टीने उपलब्ध झालेली संधी आहे. सिडकोची भूसंपदा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ही जमीन नागरिकांच्या व्यापक हितासाठी उपयोगात आणण्यासाठी अशा मोहिमा पुढेही अधिक तीव्रतेने राबविण्यात येतील.
- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT