मुंबई

अजित पवार अपघात चौकशी अहवाल कुठे?

CD

अजितदादांचा अपघात चौकशी अहवाल कुठेय?
शशिकांत शिंदे यांचा सरकारला सवाल

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आक्रमक झाला असून, सरकारच्या भूमिकेवर त्यांच्याकडून गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
सीआयडी चौकशी पूर्ण झाली, असे सांगितले जाते. जर चौकशी पूर्ण झाली असेल, तर त्या चौकशीचा अहवाल जनतेसमोर का आणला जात नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला.

ठाणे महापालिकेतील गटनेते अभिजित पवार यांच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी शशिकांत शिंदे ठाण्यात होते. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर टीका केली. या वेळी आमदार जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते अश्रफ ऊर्फ शानू पठाण, शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. अपघातानंतर राज्यभरातून निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली होती. अनेकांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तसेच सुनेत्रा पवार यांनीही स्वतंत्र तपासाची मागणी केली होती; मात्र सरकारने सीबीआय चौकशी टाळून सीआयडीमार्फत तपास केला आणि त्याचाही अहवाल अद्याप प्रसिद्ध न केल्याने संशय वाढत असल्याचे शिंदे यांनी म्हटले. जर चौकशी पारदर्शक असेल, तर अहवाल प्रसिद्ध करण्यात अडचण काय आहे? सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ठाण्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नावरूनही त्यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली. शहर झपाट्याने वाढत असताना महापालिकेकडे स्वतःचे धरण नाही. त्यामुळे नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. भविष्यात ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेल वापर आणि सोन्याच्या खरेदीसंदर्भात केलेल्या आवाहनावरूनही शिंदे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. रुपयाचे अवमूल्यन, वाढती महागाई आणि आर्थिक संकटामुळे सामान्य नागरिक अडचणीत सापडत असल्याचे सांगत सरकारने स्वतःच्या धोरणांकडे पाहावे, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

PBKS vs DC Live: स्टार्क, एनगिडी अपयशी ठरले, तिथे २२ वर्षीय माधवने मैदान गाजवले! प्रियांश, श्रेयसच्या फिफ्टीनंतरही माफक धावा...

SCROLL FOR NEXT