मुंबई

रबाळे पोलिसांनी इराणी टोळीच्या मुसक्या आवळल्या, १० गुन्ह्यांची उकल!

CD

इराणी टोळीच्या मुसक्या आवळल्या
रबाळे पोलिसांची मोठी कारवाई; आंबिलीतून तिघांना अटक
नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : ऐरोली-रबाळे परिसरात सोनसाखळी चोरट्यांनी हैदोस घातला होती. या सराईत इराणी टोळीतील त्रिकुटाला जेरबंद करण्यात रबाळे पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाद्वारे आंबिवली येथून तीन इराणी आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण १३ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे रबाळे आणि कापूरबावडी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या १० चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
रविराज कारंडे १९ एप्रिल रोजी आपल्या पत्नी आणि सासऱ्यांसह ऐरोली येथील इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळ उभे असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यावर थाप मारून दीड लाखांची सोनसाखळी हिसकावून नेली. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रबाळे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळापासून ते आंबिवली, कल्याणपर्यंतचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तांत्रिक तपास आणि गोपनीय खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी आंबिवली येथील इराणी वस्तीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्या भागात सापळा रचून अब्बास सल्लु जाफरी, हुसेनी फैयाज सय्यद आणि जाफर अब्बास अश्रफ सय्यद या तिघांना अटक केली.
या तिघांच्या चौकशीत त्यांनी रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत आठ तर ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दोन असे एकूण १० सोनसाखळ्या चोरीची कबुली दिली. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, आरोपी हुसैनी फय्याज सय्यद याच्यावर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत मिळून एकूण २५ गुन्हे दाखल आहेत, तर अब्बास सल्लू जाफरी याच्यावर २४ गुन्हे नोंद असल्याचे तपासादरम्यान समोर आले. ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलिस निरीक्षक सचिन गवळी आणि शाम बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाळदे, पोलिस उप निरीक्षक राहुल गरड व त्यांच्या पथकाने केली. सध्या आरोपी पोलिस कोठडीत असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT