मुंबई

नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठा बंद

CD

नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा
उद्यापासून २४ तास पाणीपुरवठा बंद
वाशी, ता. ११ (बातमीदार) ः नवी मुंबई पालिका क्षेत्रातील जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि देखभालीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे शहरातील बहुतांश भागांत सलग २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवारी (ता. १३) सकाळी १० वाजल्यापासून ते गुरुवारी (ता. १४) सकाळी १० वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दुरुस्तीची कामे सुरळीत पार पाडण्यासाठी आणि भविष्यातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी ही कामे आवश्यक असल्याचे पालिकेने सांगितले आहे. नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

या भागांवर परिणाम
बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, खारघर आणि कामोठे परिसर.

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक
बुधवारी संध्याकाळी आणि गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याचे पालिकेच्या वतीने स्पष्ट केले आहे. तसेच, गुरुवारी संध्याकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! पुनर्विकासात आता फक्त घरे नाहीत; पायाभूत सुविधांनाही प्राधान्य मिळणार

Latest Marathi News Live Update: उद्योग व वाणिज्य आणि गुंतवणूक प्रोत्साहन या विभागांची खाती अमन अरोरा यांना सोपवण्यात आली

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

Water Supply Scheme : पाणीपुरवठा योजना ताब्यात घेण्यासाठी फुरसुंगी नगरपरिषदेला महापालिकेचे पत्र

Mumbai Water Supply: मुंबईकरांनो सावधान! १५ मेपासून पाणीपुरवठ्यात कपात; बीएमसीचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT