मुंबई

समाधान शिबिरात दाखल्यांचे वाटप

CD

समाधान शिबिरात दाखल्यांचे वाटप

पेण, ता. ११ (वार्ताहर) : राज्य शासनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर राबवण्यात येत असताना या शिबिरात नागरिकांना एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनांचे दाखले मिळत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असल्याचे आमदार रवींद्र पाटील यांनी सांगितले.
सार्वजनिक विद्यामंदिर पेण येथील प्रांगणात शुक्रवारी (ता. ८) महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, तहसीलदार तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार प्रसाद काळेकर, नितीन परदेशी, सार्वजनिक विद्यामंदिरचे अध्यक्ष पी. डी. पाटील, जि.प. माजी सभापती डी. बी. पाटील, सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांसह नगरसेवक तसेच नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, केंद्रासह राज्य सरकारच्या असंख्य योजना येत असून, त्या सर्वसामान्य ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, तर या अभियानाचा फायदा नागरिक मोठ्या प्रमाणावर घेत असून, त्यांना एकाच ठिकाणी सातबारा, फेरफार, उत्पन्नाचे दाखले यासह इतरही अनेक महसुली दाखले, शासकीय दाखले मिळत असल्याने तालुक्यातील नागरिकांनी याचा अधिकाधिक फायदा करून घ्यावा, असे आवाहन तहसीलदार तानाजी शेजारी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT