मुंबई

मुंबईला मिळणार आणखी शुद्ध पाणी

CD

मुंबईला मिळणार आणखी शुद्ध पाणी
पिसे पांजरापूर केंद्र उभारणीला गती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबईला अधिक स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पिसे पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात ९१० दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून मुंबई महापालिकेला सल्लागारासाठी २३ कोटी रुपये मोजणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी भातसा धरणातून मुंबईला होणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण पिसे पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात केले जाते. आशिया खंडातील सर्वांत मोठ्या जलशुद्धीकरण संकुलांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या केंद्रातून मुंबई महापालिकेच्या बहुतांश भागांना पाणीपुरवठा केला जातो. हा प्रकल्प तीन टप्प्यांत उभारण्यात आला असून पहिल्या टप्प्यातील जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी १९७९मध्ये करण्यात आली होती. तब्बल ४७ वर्षांपासून सुरू असलेल्या वापरामुळे आणि क्लोरीनसारख्या रसायनांच्या सतत संपर्कामुळे या केंद्राच्या संरचनेची मोठ्या प्रमाणात झीज झाली. त्यामुळे या जुन्या प्रकल्पाचे आयुर्मान संपुष्टात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
...
क्षमता वाढणार
भविष्यात पाणीपुरवठ्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी जुन्या प्रकल्पाच्या पुनर्बांधणीपूर्वी त्याच संकुलात नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या ९१० दशलक्ष लिटर क्षमतेच्या प्रकल्पामुळे प्रकल्पाची क्षमता वाढून १,८२० दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे १,६८५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT