मुंबई, ता. ११ : मुंबईतील अत्यंत उच्चभ्रू वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळीच्या आदर्शनगर येथील ५० ते ६० वर्षांपूर्वीच्या म्हाडाच्या पाच हजारांहून अधिक गृहनिर्माण संस्थांचा समूह पुनर्विकासाची व्याप्ती लक्षात घेऊन काढलेल्या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला. पुनर्विकासाची प्रक्रिया ही न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन असेल, असेही स्पष्ट केले.
मुंबईतील शहर आणि उपनगरात परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीच्या उद्देशाने म्हाडाच्या मुंबई मंडळाद्वारे, १९५० ते १९६० या कालावधीत मध्यम आणि अल्प उत्पन्न गटांसाठी ५६ वसाहती उभारण्यात आल्या. त्यामध्ये अंदाजे पाच हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे. या इमारती जुन्या झाल्यामुळे, काही मोडकळीस तर काहींची अवस्था दयनीय झाली आहे. परिणामी, अशा इमारतींचा पुनर्विकास करणे आता अत्यावश्यक असल्याचे निरीक्षण न्या. मकरंद कर्णिक आणि न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने स्थगिती नाकारताना नोंदवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.