मुंबई

“मला अ‍ॅडमिट करा!” हट्टासाठी आरोपीचा मध्यवर्ती रुग्णालयात धिंगाणा

CD

मध्यवर्ती रुग्णालयात कैद्याचा गोंधळ
डॉक्टरांनी दाखल करण्यास नकार देताच आरोपीचा धिंगाणा

उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) : कल्याणच्या आधारवाडी कारागृहातून उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी एका आरोपीला आणण्यात आले होते. या आरोपीने रुग्णालयातच राडा घालत पोलिसांच्या केबिनची काच फोडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आरोपीच्या आक्रमक वर्तनामुळे रुग्ण, नातेवाईक आणि रुग्णालय कर्मचारी काही काळ धास्तावले होते.
कल्याण येथील आधारवाडी कारागृहातील आरोपी अजबिल अन्सारी याला पोटदुखीच्या तक्रारीमुळे उपचारासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याची तपासणी करून प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात पाठविण्याचे निर्देश दिले. मात्र, आरोपीने रुग्णालयातच दाखल करून घेण्याचा हट्ट धरला. डॉक्टरांनी त्यास नकार दिल्यानंतर तो संतापला आणि रुग्णालयातील पोलिस कर्मचारी बसत असलेल्या केबिनच्या काचेवर डोके आपटून काच फोडली.
आरोपी जोरजोरात ओरडत स्वतःला रुग्णालयात दाखल करण्याची मागणी करत होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपचारासाठी आलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन आणि पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत अन्य कोणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, याप्रकरणी संबंधित विभागाकडून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT