मुंबई

इरशाळवाडीत ट्रेक ठरला अखेरचा प्रवास; डोंगर चढताना काळाचा घाला

CD

इर्शाळगडावर ट्रेकदरम्यान तरुणाचा उष्माघाताने मृत्यू

खालापूर, ता. ११ (बातमीदार) : इर्शाळगडावर ट्रेकसाठी मित्रांसोबत डोंबिवलीहून आलेल्या २० वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. ११) दुपारी घडली. रितेश कोणका असे मृत तरुणाचे नाव असून, वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे ट्रेकिंगदरम्यान त्याची प्रकृती अचानक बिघडली होती.
सोमवारी (ता. ११) सकाळी रितेश हा आपल्या मित्रांसह इर्शाळगड ट्रेकसाठी चौक येथे आला होता. दुपारच्या सुमारास उष्णतेचा तडाखा वाढल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर येऊन तो खाली कोसळला. त्याच्यासोबत असलेल्या साहिल सुर्वे, युवराज चव्हाण, मितेश गुप्ता, देवेश गुप्ता आणि क्रिश शेट्टी या मित्रांनी तातडीने मदतीसाठी हेल्पलाइनवर संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिस उपनिरीक्षक विशाल पवार तसेच स्थानिक तरुण मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. इर्शाळवाडी ग्रामस्थांच्या मदतीने झोळीच्या सहाय्याने रितेशला गडावरून खाली आणण्यात आले. त्यानंतर त्याला चौक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे रितेशसोबत आलेल्या मित्रांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. वाढत्या तापमानात ट्रेकिंग टाळावे, असे आवाहन हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांनी केले आहे.

चौकट
महिनाभरापूर्वीही इर्शाळगडावर सोलो ट्रेकसाठी आलेल्या एका ट्रेकरचा पडून मृत्यू झाला होता. गडाचा माथा ढासळत असून, मोठमोठे दगड कोसळत आहेत. त्यामुळे इर्शाळगड ट्रेकर्ससाठी धोकादायक ठरत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Indian Army Soldier: देशसेवेचे व्रत अपुरेच राहिले! जावळीचा जवान तुषार भिलारेंची झुंज अपुरी ठरली, दोन चिमुकल्या मुलींसह कुटुंब पोरके..

SCROLL FOR NEXT