मुंबई

बुलेट ट्रेन प्रकल्पाचा प्रत्यक्ष अनुभव

CD

बुलेट ट्रेन प्रकल्पाची विद्यार्थ्यांना सफर
डहाणूच्या आश्रमशाळेतील ४५ जणांचा सहभाग
कासा, ता. १२ (बातमीदार) ः आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत येणाऱ्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळेतील ४५ विद्यार्थ्यांनी देशातील महत्त्वाच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाची भेट देत आधुनिक तंत्रज्ञानाचा अविस्मरणीय अनुभव घेतला.
डहाणू प्रकल्पांतर्गत सवने, झरी, तलासरी, तवा, साखरे, रणकोळ, अस्वाली, वरवाडा, डोंगरी, उधवा येथील १० आश्रमशाळांमधील ३५० विद्यार्थी बारावीच्या पूर्वतयारीसाठी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांमधून इच्छुक ४५ विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत आधुनिक प्रकल्पांची माहिती मिळावी, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या दौऱ्यात विद्यार्थ्यांनी आशागड तसेच आंबेसरी परिसरातील बुलेट ट्रेनच्या बोगद्यांची पाहणी केली. डोंगरातून तयार होत असलेले बोगदे, त्यासाठी वापरले जाणारे अत्याधुनिक यंत्रसामग्री पाहून विद्यार्थी भारावले होते. एल अँड टी कंपनीच्या तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना बोगद्यांची रचना, लांबी, तांत्रिक वैशिष्ट्ये सोप्या भाषेत समजावून सांगितले.
------------------------------------
भविष्यातील संधीबाबत उत्सुकता
विद्यार्थ्यांनी अदाणी थर्मल पॉवर स्टेशनलाही भेट देत विविध प्रकल्पांची माहिती घेतली. ऊर्जा निर्मिती प्रक्रिया, आधुनिक यंत्रणा आणि औद्योगिक व्यवस्थापन याविषयी माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळाली. देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम जवळून पाहण्याची संधी मिळाल्याने उत्साहाचे वातावरण होते. तसेच भविष्यातील वाहतूक व्यवस्था, अभियांत्रिकी क्षेत्रातील संधींबाबत उत्सुकता दिसून आली.
----------------------------
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष तांत्रिक अनुभव मिळावा, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. तसेच अभ्यास दौऱ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या विचारविश्वात सकारात्मक बदल घडून त्यांच्या करिअरच्या संधी खुल्या होतील, अशी भावना डहाणूचे सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Import Duty Hike in India : सोनं-चांदीसह मौल्यवान धातू महागणार! मध्यरात्री केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Maharashtra Doctor Transfers: राज्यातील ९०० डॉक्टरांच्या बदलीच्या आदेशाने उडाली खळबळ; मूळ पदावर होणार रवानगी, सोयीच्या ठिकाणी वशिल्याने गेलेल्यांना दणका

निदा खानला मदत करणाऱ्या नगरसेवक मतीन पटेलच्या मालमत्तेवर महापालिकेचा बुलडोजर; पत्नी अन् मुलीने फुलं देऊन केलं स्वागत

Shreyas Iyer: गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या चुका पंजाबला महागात; श्रेयस अय्यर संतापला; २१० धावाही अपुऱ्या ठरल्या! दिल्लीकडून पंजाबचा थरारक पराभव

IMD monsoon forecast update अंदमानात मॉन्सूनची चाहूल, चार-पाच दिवसांत आगमन; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

SCROLL FOR NEXT