मुंबई

पटसंख्या वाढीसाठी नवा आराखडा

CD

उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेच्या शाळांमधील घटती पटसंख्या रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, आगामी शैक्षणिक वर्षात पहिलीच्या प्रवेशात वाढ करण्यासाठी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सर्व मुख्याध्यापकांना विशेष कृती आराखडा राबविण्याचे आदेश दिले आहेत. ‘गुढीपाडवा, पट वाढवा’ अभियानापासून ते ‘शाळा आपल्या दारी’ उपक्रमापर्यंत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून पालकांपर्यंत थेट पोहोचण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये काही वर्षांत पहिलीच्या पटसंख्येत घट झाल्याची बाब समोर आल्यानंतर राज्यस्तरीय समितीच्या अहवालानुसार प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे ही महापालिकेची जबाबदारी असल्याने प्रवेश वाढीसाठी दोन टप्प्यांत विशेष मोहीम राबविण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत. जून महिन्यापर्यंत प्रवेशोत्सव, गृहभेटी, माता-पालक मेळावे, अंगणवाडी समन्वय; तसेच समाजमाध्यमांद्वारे शाळांची प्रसिद्धी यावर भर दिला जाणार आहे. ‘शाळा आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी थेट पालकांच्या घरी जाऊन संवाद साधावा, मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे आणि दाखलपात्र विद्यार्थ्यांची माहिती संकलित करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे व्हिडिओ, प्रवेशासाठी आकर्षक बॅनर आणि समाज माध्यमांच्या माध्यमातून महापालिका शाळांची सकारात्मक प्रतिमा उभी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

‘शाळा मित्र’ उपक्रम राबवणार
शाळा सुरू झाल्यानंतर वर्षभर गुणवत्तापूर्ण अध्यापन, इंग्रजी व सेमी-इंग्रजी वर्ग, व्हॉट्सॲपद्वारे पालकांशी संवाद, शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार; तसेच ‘शाळा मित्र’ उपक्रम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार एफएलएन कार्यपुस्तिका आणि नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे राबवून महापालिका शाळांबद्दल पालकांमध्ये विश्वास निर्माण करण्यावर प्रशासनाचा भर असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Taxi: अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा, परिवहन मंत्र्याचे सायबर क्राईम विभागाकडे मागणी

BAN vs PAK 1st Test : बांगलादेशने घरी बोलवून पाकिस्तानला ठेचले; WTC मध्ये नाचक्की, शाहीन आफ्रिदीच्या संघाचा लाजीरवाणा पराभव

Kalyan Crime News : कल्याण हादरलं! 78 वर्षीय नराधम भोंदूबाबाचा 15 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; पूजेच्या बहाण्यानं केलं काळं कृत्य

Mohol Accident : ईरटीगा कार आणि मालट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यातील तापमानात पुन्हा वाढ; 42 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले तापमान

SCROLL FOR NEXT