नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या स्कूल ऑफ आयुर्वेद अंतर्गत शल्य तंत्र विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या अनुशल्य जिज्ञासा २के२६ या दोनदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाला देशभरातील आयुर्वेद तज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘अनु शस्त्रम् ज्ञानम् शाश्वतम्’ संकल्पनेवर आधारित या परिसंवादाने आयुर्वेदातील पॅरा सर्जिकल उपचार पद्धतींना राष्ट्रीय स्तरावर नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
अग्निकर्म, मर्म चिकित्सा, रक्तमोक्षण, क्षार कर्म यांसारख्या पारंपरिक उपचार पद्धतींवरील ज्ञानवर्धन, नवसंशोधन, शैक्षणिक चिंतन आणि अनुभवांचे आदान-प्रदान यासाठी हा परिसंवाद अत्यंत उपयुक्त ठरला. देशभरातून आलेल्या ३०० हून अधिक डॉक्टर, पदव्युत्तर विद्यार्थी आणि संशोधकांनी यात सक्रिय सहभाग घेतला.
परिसंवादाच्या उद्घाटन समारंभाला डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या मॅनेजिंग ट्रस्टी तथा डी-सीएएल आणि डीवायपीयु शॉपच्या संस्थापक राजलक्ष्मी व्ही. पाटील, भारत सरकारच्या एमएआरबीआयएसएम, एनसीआयसीएमचे अध्यक्ष डॉ. मुकुल पटेल, आयुर्वेद व्यासपीठाचे संस्थापक अध्यक्ष वैद्य विनय वेलणकर तसेच आर. ए. पोदार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. संपदा संत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
परिसंवादातील विशेष आकर्षण ठरलेल्या “सुश्रुत रत्न पुरस्कार” समारंभात आयुर्वेद क्षेत्रातील उल्लेखनीय व आजीवन योगदानाबद्दल डॉ. एम. ए. लहाणकर, डॉ. रुजुता दुबे आणि डॉ. विजय उखलकर यांना सन्मानित करण्यात आले.
समारोप सोहळ्यात खारघर येथील ‘ईस्कॉन’चे प्रमुख एच. जी. डॉ. सूरदास प्रभू, एनआयए जयपूरचे प्रो चान्सलर डॉ. पी. हेमंत कुमार, डॉ. विनायक तायडे आणि डॉ. मुकेश शुक्ला यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून आयुर्वेदातील शल्य विज्ञान, संशोधन आणि सेवाभाव या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्याचा संदेश देण्यात आला.
नवी मुंबई : आयुर्वेद क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. एम. ए. लहाणकर यांचा सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.