मुंबई

पनवेलमध्ये वाइन शॉप फोडले

CD

पनवेलमध्ये वाइन शॉप फोडले
पावणे तीन लाखांची विदेशी दारू आणि रोकड लंपास
पनवेल, ता. १२ (वार्ताहर) ः पनवेल शहरातील ठाणा नाका परिसरातील एका नामांकित वाइन शॉप फोडल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून तब्बल दोन लाख ७६ हजार किमतीची महागडी विदेशी दारू आणि रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पनवेल येथील ठाणा नाका परिसरातील सिटी वाइन शॉप हे दुकानांचे शटर चोरटयांनी रविवारी (ता. १०) पहाटेच्या सुमारास उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील महागड्या ब्रँड्सच्या बाटल्यांवर डल्ला मारला. रविवार सकाळी दुकान उघडले असता ही बाब समोर आली.
चोरीला गेलेल्या मालामध्ये प्रामुख्याने ग्लेनफिडिच १८ आणि १२ इयर्स: ६ हून अधिक बाटल्या, ब्लॅक लेबल, रेड लेबल आणि ब्लू लेबल, रॅम्पूर, इंद्री, ब्लॅक अँड व्हाईट, डबल ब्लॅक यांसारख्या महागड्या ब्रँड्सचा समावेश आहे. यासोबतच गल्ल्यातील सुमारे ३० हजारांची रक्कम आदींचा समावेश आहे. तसेच, चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर संच देखील चोरून आहे. या प्रकरणी वाइन शॉपचे मालक रमेश उतेकर (४८) यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TVK MLA Ban: टीव्हीके आमदाराला विधानसभेत प्रवेश बंदी; विश्वासदर्शक ठरावापूर्वी विजय सरकारला मोठा धक्का

Pune Nasrapur Case : नसरापूर अत्याचार प्रकरण : चिमुरडीच्या शरीरावर गंभीर जखमा, आरोपीची तपासात उडवाउडवीची उत्तरे; पोलिसांचा न्यायालयात मोठा खुलासा

Latest Marathi News Live Update : नीट पेपर फूट प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी मूळचा अहिल्यानगरमधील, दुसरा आरोपी पुण्यातला

Sangli Police : सांगली पोलिसांचा संतापजनक प्रकार! संशयित समजून दोघा चुलत भावांना विवस्त्र करून बेदम मारहाण, आमदार जयंत पाटलांनी केली विचारपूस

Bibvewadi Fire : बिबवेवाडीत भीषण आगीत मंडप साहित्याचे गोदाम भस्मसात; दोन ट्रकसह सात दुचाकी खाक, मोठी जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT