मुंबई

शासनाचा महसूल बुडवणारा नंबरप्लेटचा गेम उघड

CD

शासनाचा महसूल बुडवणारा नंबर प्लेटचा गेम उघड
सानपाडा पोलिसांकडून ट्रान्सपोर्ट मालकासह चालकावर गुन्हा दाखल
नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : शासनाचा महसूल चुकवण्यासाठी आणि प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी आपल्या गाड्यांवर दुसऱ्याच वाहनांच्या नंबर प्लेट लावून फसवणूक करण्याचा प्रकार सानपाडा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कृष्णा ट्रान्सपोर्टच्या मालकासह चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील कारवाई सुरू केली आहे.
तक्रारदार शौकतअली अन्सारी यांचा मुंबईत डेकोरेटर्सचा व्यवसाय असून, त्यांनी फेब्रुवारीमध्ये नवी कोरी पिकअप गाडी खरेदी केली होती. ही गाडी एप्रिल महिन्यापर्यंत गॅरेजमध्ये होती. तरी अन्सारी यांना त्यांच्या मोबाईलवर वाहतूक पोलिसांचे दोन हजारांच्या दंडाचे मेसेज आले. गाडी गॅरेजमध्ये असताना त्यावर दंडाचे चलान आल्याने त्यांनी याचा शोध सुरू केला. यादरम्यान, ५ मे रोजी रात्री अन्सारी यांच्या पिकअप गाडीच्या नंबर प्लेटशी तंतोतंत नंबर प्लेट असलेली दुसरी गाडी जुईनगर येथे निदर्शनास आली. त्यामुळे अन्सारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर सानपाडा पोलिसांनी या वाहनाच्या गाडीवरील नंबर प्लेटची तपासणी केली असता, ही गाडी कृष्णा ट्रान्सपोर्टची असल्याचे आणि त्याच्यावर बनावट नंबर प्लेट लावण्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आरटीओच्या मदतीने कृष्णा ट्रान्सपोर्टच्या इतर गाड्याचीही तपासणी केली असता तिन्ही गाड्यांवर बनावट नंबर प्लेट्स बसवल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी कृष्णा ट्रान्सपोर्टचा मालक किशन सावंत, गाडी चालक प्रवीण दातीर आणि एक अनोळखी चालक अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT