टिटवाळा, ता. १३ (वार्ताहर) : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरीप्रणीत)अंतर्गत पर्यावरण, प्रकृती व बालसंस्कार विभागाच्या माध्यमातून गंगादशहरानिमित्त रविवारी (ता. १७) टिटवाळा पश्चिम येथील गणेश घाट, काळू नदी परिसरात नदी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या अभियानातून नदी संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि जलजागृतीचा संदेश दिला जाणार आहे.
काळू नदी परिसरात होणाऱ्या या अभियानाची सुरुवात रुद्राभिषेकाने होणार असून त्यानंतर नदीकाठ स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. प्लॅस्टिक व इतर कचरा हटवून स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सेवेकरी पुढाकार घेणार आहेत. या वेळी गंगापूजन, पर्जन्यसूक्त पठण, काळू नदीचा मान-सन्मान अशा धार्मिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम होणार आहेत. या माध्यमातून नदी हीच जीवनरेषा हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारावी, यासाठी जनजागृतीही करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बालसंस्कार विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच नदी, पर्यावरण आणि जलस्रोतांविषयी संवेदनशीलता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. या उपक्रमात टिटवाळा शहरातील तिन्ही केंद्रांचे प्रतिनिधी, पंचकमिटी सेवेकरी, भाविक, ग्रामस्थ, १८ विभागांचे प्रतिनिधी; तसेच सर्व बालसंस्कार विभागातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. नदी संवर्धनासाठी सामाजिक सहभाग वाढविणे आणि स्थानिक स्तरावर स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाची चळवळ उभी करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.