सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : वाळवण महोत्सवाचे महापालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांत उद्घाटन करण्यात आले. पालिकेच्या नियोजन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या दोनदिवसीय महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. महिला बचत गटांनी तयार केलेल्या शेवया, पापड, कुरडई, लोणची, सांडगे, मसाले, सुकी मच्छी तसेच इतर पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स या महोत्सवात उभारण्यात आले आहेत.
मुंबई महापालिकेने महिला सशक्तीकरणासाठी महानगरातील महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनविण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून विविध योजना अंमलात आणल्या आहेत. याच अनुषंगाने बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी वाळवण महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष मीनल तुर्डे, संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी जी उत्तर आणि एस या प्रशासकीय विभागांमधील वाळवण महोत्सवाला भेट देऊन महोत्सवाची पाहणी केली. यानिमित्ताने घरगुती लोणचे, पापड, कुरडई, सांडगी, चटणी आणि मसाले अशा विविध गृहाेपयोगी वस्तू एकाच ठिकाणी खरेदी करण्याचा लाभ स्थानिकांनी घेतला.
महिला बचत गटांनी सादर केलेल्या विविध पारंपरिक वाळवण पदार्थांचे प्रदर्शन, विक्री व्यवस्था आणि उत्पादनांची गुणवत्ता यांची मीनल तुर्डे यांनी माहिती घेतली. बचत गटांच्या महिलांशी संवाद साधत त्यांच्या मेहनतीचे आणि उद्योजकतेचे तसेच पाक कौशल्याचे कौतुक केले. महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत अशा उपक्रमांमुळे महिलांना आर्थिक बळ मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.