मुंबई

महालक्ष्मी येथील पायलीच्या डोंगराला पुन्हा वणवा

CD

पायलीच्या डोंगराला वणव्याची झळ
वन विभागाची रात्रभर धावपळ
कासा, ता. १२ (बातमीदार)ः विवळवेढे-महालक्ष्मी परिसरात पायलीच्या डोंगराला रविवारी संध्याकाळी भीषण वणवा लागला होता. कडक उन्हाळ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण करत डोंगराचा मोठा भाग भस्मसात केला आहे.
डहाणू तालुक्यातील मेंढवन, विवळवेढे, धानिवरी भागांत मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल आहे. या भागात दरवर्षी उन्हाळ्यात वारंवार वणवे लागण्याच्या घटना घडतात. रविवारी लागलेल्या आगीमुळे डोंगराचा अर्ध्याहून अधिक भाग जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे सुमारे १५ कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. उंच डोंगर, खाचखळगे, अंधारामुळे आग विझवताना कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, रात्री दीड ते दोनच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात कर्मचाऱ्यांना यश आले.
--------------------------------
औषधी वनस्पतींचे नुकसान
या भागात गडावरील महालक्ष्मी देवीचा मंदिर आहे. गेल्या महिनाभरात परिसरात तिसऱ्यांदा वणवा लागल्याची नोंद झाली आहे. प्रचंड उष्णतेमुळे जंगलातील गवत, झाडे पूर्णपणे कोरडी असल्याने छोट्याशा ठिणगीमुळेही मोठी आग भडकत आहे. त्यामुळे जंगलातील जैवविविधता तसेच औषधी वनस्पतींचे मोठे नुकसान झाले आहे.
-----------------------------
जंगलात शिकारीसाठी किंवा शेतातील राब जाळताना अशा घटना घडत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. त्यामुळे जंगलांना मुद्दाम आग लावणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
- सूजय कोळी, वनक्षेत्रपाल, कासा वन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT