मुंबई

घाटकोपरातील भूमिगत कचरा पेट्यांची दुरवस्था

CD

घाटकोपरातील भूमिगत कचरापेट्यांची दुरवस्था
रस्त्यावरच साचतो कचरा; नागरिक त्रस्त
घाटकोपर, ता. १२ : घाटकोपर परिसरात स्वच्छतेसाठी बसविण्यात आलेल्या भूमिगत कचरापेट्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, अनेक ठिकाणी या पेट्या निकामी झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्वच्छ मुंबईच्या दाव्यांना तडा देणारी ही परिस्थिती स्थानिकांच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
विशेषतः भटवाडी आणि जगदूशा नगर परिसरातील भूमिगत कचरा पेट्यांची अवस्था गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी कचरा पेटीत न पडता थेट रस्त्यावर साचत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून, दुर्गंधीचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. नियमित साफसफाई होत नसल्याने डास, माश्या तसेच भटक्या प्राण्यांचा वावर वाढला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, भूमिगत कचरापेटी ही संकल्पना उपयुक्त असली तरी तिच्या देखभालीकडे बृहन्मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून केवळ तात्पुरती दुरुस्ती केली जाते. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, पावसाळा तोंडावर असताना या कचरापेट्यांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असून, त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, अशी भीती सामाजिक कार्यकर्ते मनोहर जरियाल यांनी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी कचरा रस्त्यावर साचत असल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे.
महापालिकेने तातडीने सर्व भूमिगत कचरापेट्यांची पाहणी करून दुरुस्ती करावी, नियमित साफसफाई सुनिश्चित करावी आणि आवश्यक त्या ठिकाणी नवीन यंत्रणा उभारावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच स्वच्छता व्यवस्थेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवून नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

पालिकचे म्‍हणणे काय?
घनकचरा विभागाचे सहाय्यक अभियंता साजिद सौदागर म्हणाले, सध्या वापरात असलेल्या काही जुन्या कचरा उचलणाऱ्या गाड्यांची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, १५ जूननंतर नवीन गाड्या सेवेत दाखल होणार असून, त्यानंतर परिस्थितीत निश्चित सुधारणा होईल. घाटकोपर परिसरातून दररोज सुमारे २१५ मेट्रिक टन कचरा उचलला जात आहे. सकाळी आणि दुपारी अशा दोन शिफ्टमध्ये नियमितपणे कचरा उचलण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT