सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : सरकारच्या नियमानुसार शाळेच्या प्रवेशासाठी कोणतीही फी आकारणी देय नसताना विद्यार्थ्यांकडून बेकायदा पैसे उकळणाऱ्या भिवंडीतील तिघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. ते तिघे भिवंडीत राहणारे आहेत. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या पाल्याला शाळेत प्रवेश देण्यासाठी त्या तिघांनी चार हजारांची मागणी केली होती. यामध्ये तीन हजार रुपये विविध उपक्रम शुल्काच्या नावाखाली, तर एक हजार रुपये शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर परत केले जातील, असे सांगत होते. यासाठी विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने पैसे वसूल केले जात असल्याची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्यामध्ये तथ्य आढळून आल्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ मे २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. सलाहुद्दीन आयुबी मेमोरियल उर्दू हायस्कूल या शाळेच्या मुख्याध्यापिका अतिया बैदुझमान खान (वय ५६), खासगी संगणक शिक्षक रिजवान बानू अमजद खान (३१), आणि खासगी लिपिक आस्मा मोहशफी शेख (४७) यांना लाच रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.