मुंबई

सुट्ट्यांमध्ये अनधिकृत बांधकामाला जोर

CD

भिवंडी, ता. १२ (बातमीदार) : शासकीय कार्यालयांना गेल्या दोन-तीन महिन्यांत लागोपाठ सुट्ट्या असल्याचा गैरफायदा घेत शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली. या काळात प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी डोळेझाक केली, तर नगरसेवकांनीदेखील दुर्लक्ष केल्याने पालिकेच्या क्षेत्रात नव्याने अनधिकृत बांधकामांमध्ये भर पडली आहे. पालिकेच्या पाच प्रभाग समितींपैकी प्रभाग समिती क्रमांक दोनमध्ये मोठ्या संख्येने कमी वेळात उंच अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत.

भिवंडी-निजामपूर महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे आणि रस्त्यावरील अतिक्रमण वारंवार तोडूनदेखील काही दिवसांनी हे पुन्हा उभे राहतात. यासाठी महापालिकेने ठोस पावले उचलले पाहिजे. मागील आठवड्यात समिती क्रमांक दोनच्या कार्यक्षेत्रात अवैध बांधकाम आणि अतिक्रमणांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली होती. पालिका प्रशासनाने शांतीनगर भाजी मार्केट आणि रावजीनगर परिसरातील लोकवस्तीमध्ये तोडक कारवाईची मोहीम राबवली. त्यामुळे अनधिकृत काम करणाऱ्या विकसकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. प्रभाग समिती दोनचे सहाय्यक आयुक्त विनोद मनोरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत बीट निरीक्षक धनराज पाटील यांच्यासह अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे एक पथकही उपस्थित होते. महापालिका अधिकाऱ्यांनी परिसरातील अवैध बांधकाम, रस्त्याच्या कडेला केलेले अतिक्रमण आणि सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली.

शांतीनगर भाजी मार्केट परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बऱ्याच काळापासून रस्त्यावरील अतिक्रमण एक समस्या आहे. अनधिकृत शेड, दुकानांचा विस्तार आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास होत होता. त्याचप्रमाणे, रावजीनगर परिसरात परवानगीशिवाय सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी येत होत्या. अधिकाऱ्यांच्या मदतीने कर्मचाऱ्यांनी जेसीबी आणि इतर उपकरणांचा वापर करीत बेकायदा बांधकामे हटवण्यात आली. अधिकाऱ्यांनी यापूर्वी बजावण्यात आलेल्या नोटीसविषयी संबंधित लोकांना माहिती दिली. सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही आणि भविष्यातही अशा मोहिमा सुरूच राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

फसवणूक, दुर्घटनेची शक्यता
शासकीय सुट्टीच्या काळात रावजीनगर आणि परिसरात मोठ्या संख्येने विनापरवानगी अनधिकृत बांधकामे फारच कमी वेळात उभी राहिली आहेत. या बांधकामामध्ये चार ते सहा मजली अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्यामुळे त्यांचे बांधकाम कमकुवत असल्याचा दावा होत आहे. अशा अनधिकृत बांधकामाच्या इमारतीमध्ये सदनिका घेणाऱ्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वाढत आहे.

कारवाईचा दावा
याबाबत प्रभाग समिती क्रमांक दोनचे प्रभाग अधिकारी विनोद मनोरे यांनी सांगितले, की अनधिकृत बांधकामांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Expansion : मोदी कॅबिनेटमध्ये होणार मोठा गेमचेंजर! सर्वांच्या नजरा 'या' दोन नावांवर, अमित शाहांच्या भेटीनंतर दिल्लीत खळबळ!

Pali Flyover Construction Update : 34 ते 35 खांब आणि नवा आराखडा! मुंबई-गोवा हायवेवरील पाली उड्डाणपूल कधी सुरू होणार? समोर आली मोठी अपडेट

FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

SCROLL FOR NEXT