कबड्डी स्पर्धेत अंकुर संघाला जेतेपद
भाईंदर, ता. १२ (बातमीदार) : भाईंदरजवळील राई येथील बालयोगी सदानंद बाबा कबड्डी संघाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबईचा अंकुर संघ विजयी झाला असून, मुंबई उपनगरातील जॉली संघ हा उपविजेता ठरला.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने राई गावात नुकतेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा पुरुष गटातील अंतिम सामना अंकुर संघ विरुद्ध जॉली मुंबई उपनगर यांच्यात रंगला त्यात अंकुर संघाने बाजी मारली. ओवली क्रीडा मंडळ व जय हनुमान संघ अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकावर राहिले. मालिका वीर सुशांत साहिल, उत्कृष्ट चढाई नामदेव ईशावलकर व उत्कृष्ट पकड केतन माफलकर यांना बक्षीस देण्यात आले.
कुमारी गटासाठी झालेल्या स्पर्धेत अंतिम विजेता सफाळे येथील कुरडई संघ, तर उपविजेता राई येथील बालयोगी सदानंद बाबा कबड्डी संघ ठरला. या गटातील तृतीय व चतुर्थ बक्षीस अनुक्रमे विरारच्या युवा प्रतिष्ठान व कल्याण येथील ज्ञानशक्ती या संघांना मिळाले. कुमारी गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीर म्हणून भार्गवी म्हात्रे हिने पुरस्कार पटकावला. किशोर मुले गटात अंतिम विजेता बालयोगी सदानंद बाबा कबड्डी संघ व छत्रपती भाईंदर संघ हा उपविजेता ठरला. या गटात मालिका वीर बालयोगी संघाचा संदीप बिश्वकर्मा, तसेच उत्कृष्ट पकड राज रेड्डी व उत्कृष्ट चढाई विवेक, उत्कृष्ट पकड पायल बेलेकर, उत्कृष्ट चढाई पुरस्कार संजना भोईर यांना देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.