मुंबई

कामगारांनी एकजुटीने लढावे

CD

शिवडी, ता. १२ (बातमीदार) : ‘कामगारांच्या अनिर्णित प्रश्नावर कामगार संघटनांना आता पुन्हा आपापले झेंडे बाजूला ठेवून, वैचारिक तत्त्व मागे सारून, लढण्यास सिद्ध व्हावे लागेल, एकजुटीचा हा लढा जरा जरी विस्कळित झाला तर सरकार कामगारांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करील आणि ते प्रश्न अखेर मागे पडतील, तेव्हा हा लढा अधिक तीव्र करावा लागेल,’ असे आवाहन कामगार नेते, आमदार सचिन अहिर यांनी येथे आपल्या सत्काराला उत्तर देताना केले.

‘इंटक’चा ७९ वा वर्धापनदिन नुकताच फोर्टमधील राज्यशाखेत पार पडला. या औचित्याने ज्या-ज्या कामगार नेत्यांनी ‘इंटक’च्या नेतृत्वाखाली कामगारांच्या विविध प्रश्न सोडवणुकीवर आपले योगदान दिले आहे. त्या सर्वांचा सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. त्यामध्ये माजी गृहनिर्माण राज्यमंत्री आमदार सचिन अहिर यांचे नाव वरच्या क्रमांकावर होते. आमदार सचिन अहिर २००४ ते २००७ या कालावधीत महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष होते. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या मनोहर फाळके सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते आणि कार्याध्यक्ष निवृत्ती देसाई यांच्या हस्ते आमदार अहिर यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी सचिन अहिर म्हणाले की, गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर १६ कामगार संघटनांकडून आवाज उठविला गेल्यामुळेच सन २०२४ च्या अध्यादेशातील कामगारांना जाचक ठरणारे कलम १७ रद्द करण्यात आपल्याला यश आले. एवढेच नव्हे तर यापुढे गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळाले पाहिजे, ही मागणी मान्य करून घेतानाच अन्य प्रमुख मागण्यांवर सरकारचे सकारात्मक आश्वासन मिळविले आहे. ते पूर्ण नाही झाले, तर पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा यापूर्वीच रोकठोक इशारा देण्यात आला आहे. शंभर वर्षांपूर्वी कामगारांनी लढून मिळविलेले कामगार कायदे केंद्र सरकारने मोडीत काढून केवळ परदेशी गुंतवणूकदारांच्या प्रलोभनापोटी, चार कामगार संहिता लागू केल्या आहेत. या वेळी पदाधिकारी, संघटन सेक्रेटरी, प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवडी : ‘इंटक’च्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सचिन अहिर यांचा सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Import Duty Hike in India : सोनं-चांदीसह मौल्यवान धातू महागणार! मध्यरात्री केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Maharashtra Doctor Transfers: राज्यातील ९०० डॉक्टरांच्या बदलीच्या आदेशाने उडाली खळबळ; मूळ पदावर होणार रवानगी, सोयीच्या ठिकाणी वशिल्याने गेलेल्यांना दणका

निदा खानला मदत करणाऱ्या नगरसेवक मतीन पटेलच्या मालमत्तेवर महापालिकेचा बुलडोजर; पत्नी अन् मुलीने फुलं देऊन केलं स्वागत

Shreyas Iyer: गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या चुका पंजाबला महागात; श्रेयस अय्यर संतापला; २१० धावाही अपुऱ्या ठरल्या! दिल्लीकडून पंजाबचा थरारक पराभव

IMD monsoon forecast update अंदमानात मॉन्सूनची चाहूल, चार-पाच दिवसांत आगमन; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

SCROLL FOR NEXT