मुंबई

खदाणीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

CD

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १२ : कल्याण पूर्वेतील नेवाळीजवळील कुशिवली येथील खदाणीत सोमवारी (ता. ११) पोहण्यासाठी गेलेल्या २९ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. अतुल बिंदू आहेर हा कल्याण पूर्वेतील गणेशवाडी परिसरातील मार्तंड निवास येथे राहत होता.

अतुल आहेर हा आपल्या तीन मित्रांसह सोमवारी दुपारच्या सुमारास कुशिवली गावाच्या हद्दीतील खदाणीत पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला. मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच हिललाइन पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने तातडीने शोधमोहीम राबवण्यात आली. काही वेळाने अतुलचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्याला तातडीने जवळील खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून हिललाइन पोलिस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT