सानपाड्यात ‘कौथिक महोत्सवा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
जुईनगर, ता. १२ (बातमीदार) : सानपाडा येथील झाशीची राणी मैदानावर बद्री-केदार चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित ‘कौथिक महोत्सव (पर्व १७वे)’ उत्साहात पार पडला. उत्तराखंडच्या समृद्ध लोकपरंपरा, कला आणि संस्कृतीचा संगम अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
‘कौथिक’ म्हणजे उत्सव किंवा जत्रा. या महोत्सवाच्या माध्यमातून गढवाली आणि कुमाऊनी संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. पारंपरिक लोकनृत्य, लोकगीते, वेशभूषा, हस्तकला तसेच उत्तराखंडच्या प्रसिद्ध खाद्यसंस्कृतीचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात सादर झालेल्या कलांनी उपस्थितांची मने जिंकली.
महोत्सवातील विविध स्टॉल्सना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी अशा उपक्रमांमुळे विविध राज्यांतील संस्कृती एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मता दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात नीलेश म्हात्रे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उत्तराखंडच्या सांस्कृतिक वारशाचे जतन व प्रसार करण्यासाठी ‘कौथिक महोत्सव’ प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.