कळवा, ता. १२ (बातमीदार) : सोसायटीच्या अधिकृत जागेत जागा बळकावणाऱ्या विकसकाच्या टोळीने अतिक्रमण केले आहे. त्यामुळे कळवा पूर्वेतील अपर्णाराज सोसायटीचे रहिवासी या बांधकाम विकसकाविरोधात एकवटले असून, आंदोलनाच्या तयारीत आहेत.
कळवा पूर्वेतील नागरिक अगोदरच अनधिकृत रस्ते, पारसिक डोंगरावरील अतिक्रमण करणाऱ्या झोपडपट्टी दादांमुळे त्रस्त आहेत. अपर्णाराज सोसायटी ही कळवा पूर्वमधील सर्वात मोठी गृहनिर्माण सोसायटी आहे. तिच्या शेजारील काही भूमाफियांनी भूखंडावर अर्धवट बांधकाम केले आहे. त्या ठिकाणी खड्डा खणल्यामुळे पाणी साठवल्याने लहान मुले तसेच नागरिकांचा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच मच्छरांची पैदास होऊन नागरिकांना साथीच्या आजारांचा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिक गेले अनेक वर्षे महापालिकेकडे करत आहेत. तरीसुद्धा काहीच कारवाई आतापर्यंत झालेली नाही.
सोसायटीने प्रकियेनुसार त्यांची जमीन मोजणीचे काम चालू केल्याने एका बांधकाम विकसकाने दादागिरी करून बांधकाम सुरू केले आहे. याविराेधात सोसायटीसह कळवा पूर्वेतील नागरिक दादागिरीविरोधात एकटवले असून कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत, असे सोसायटीचे रहिवासी सिद्धेश देसाई यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.