मुंबई

राहुल गांधी `रिस्पेक्टेड नेते'' - विक्रांत चव्हाण

CD

राहुल गांधी ‘रिस्पेक्टेड नेते’
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा ठाणे काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला. राहुल गांधी हे ‘रिस्पेक्टेड नेते’ असल्याचे सांगत ठाणे काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्या विधानावर टीका केली. या पत्रकार परिषदेला ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

“राहुल गांधी हे रिजेक्टेड नेते नसून देशातील रिस्पेक्टेड नेते आहेत. महाराष्ट्रातील समस्या सोडवण्यात अपयशी ठरत असलेले मुख्यमंत्री राहुल गांधींबाबत वक्तव्य करत आहेत,” अशी टीका विक्रांत चव्हाण यांनी केली. या वेळी त्यांनी राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून हल्लाबोल केला. ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र प्रगतीच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर होता. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्य भ्रष्टाचार, गुन्हेगारी, भोंदूगिरी आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचले आहे,’ असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांची खुर्ची डळमळीत झाली असून, लवकरच राज्यात नवा चेहरा समोर येईल, असा दावाही त्यांनी केला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आजही अनेक राज्यांमध्ये काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असल्याचे सांगत, राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची तितकी राजकीय उंची नाही, असा टोलाही विक्रांत चव्हाण यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT