मुंबई

एनआरआय पाणथळ परिसरात २५ हजारांहून अधिक फ्लेमिंगो दाखल

CD

एनआरआय पाणथळ परिसरात २५ हजारांहून अधिक फ्लेमिंगो दाखल
स्थलांतरित फ्लेमिंगोंच्या रंगात बदल; प्रणय नृत्याच्या हालचालींना सुरुवात
बेलापूर, ता. १२ (बातमीदार) ः कच्छमधील मुबलक पाणी उपलब्धतेमुळे यंदा नवी मुंबई शहरात फ्लेमिंगो दाखल होण्यास विलंब झाला असला तरी यंदा शहरातील एनआरआय पाणथळ परिसरात मागील पाच वर्षांहून अधिक फ्लेमिंगो दाखल झाले आहेत. यंदाची फ्लेमिंगोंची संख्या २५ हजारांहून अधिक असल्याची माहिती सेव्ह नवी मुंबई एन्व्हायर्न्मेंटचे संचालक सुनील अग्रवाल यांनी दिली. परिणामी, एनआरआय परिसर फ्लेमिंगो पक्ष्यांच्या आवाज, हालचाली, प्रणय नृत्यांनी अक्षरशः बहरून गेला आहे.
थंडीचा कडाका सुरू होताच मुंबईतील ठाणे, उरण, नवी मुंबई शहरातील खाडी परिसर, पाणवठे, पाणथळ जागांवर परदेशी पाहुणे पक्षी दाखल होतात. साधारणतः मार्च महिन्यापासून कच्छ आणि गल्फ प्रदेशातून हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात दाखल होतात. मात्र, यंदा काहीसे विलंबाने दाखल झालेले फ्लेमिंगो पक्षीप्रेमींच्या आनंदात भर टाकत आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे यंदाची फ्लेमिंगोंची संख्या मागील वर्षांपेक्षा अधिक आहे. २०२० मध्ये २० हजारांहून अधिक फ्लेमिंगो एनआरआय, टीएस चाणक्य, डीपीएस लेक, ठाणे क्रीक परिसरात स्थलांतर करून आले होते. मात्र, यंदा केवळ एनआरआय पाणथळ जागेवरच २५ हजारांहून अधिक फ्लेमिंगो दाखल झाले असून, त्यांना पाहण्यासाठी पर्यटकांनी, पक्षीप्रेमींनी गर्दी केली आहे.

प्रणय नृत्याच्या हालचालींना वेग
नवी मुंबईत आलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांच्या रंगात नावीन्यपूर्ण बदल होत आहे. फ्लेमिंगो पक्षी जेव्हा मुंबईत दाखल होतात तेव्हा साधारण पांढरा राखाडी रंग दिसून येतो. मात्र, मार्च महिन्यापासून या पक्ष्यांमध्ये गुलाबी रंग चढू लागत असल्याची माहिती पक्षी अभ्यासक विद्यासागर हरिहरन यांनी दिली. तर यासोबत एप्रिल-मे महिन्याच्या कालावधीत फ्लेमिंगो प्रणय नृत्य सादर करत आपला साथीदार मिळवत असल्याचेदेखील हरिहरन यांनी सांगितले. परिणामी, त्यांच्या या प्रणय नृत्याच्या हालचाली टिपण्यासाठी एनआरआय पाणथळ परिसरात पक्षी अभ्यासक, फोटोग्राफर यांची दररोज गर्दी दिसून येत आहे.

फ्लेमिंगो सिटी मात्र जनजागृती नाही
नवी मुंबई शहराला फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळखले जाते. मात्र, महापालिकेकडून एनआरआय परिसरात फ्लेमिंगो पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी कोणत्याही मार्गदर्शन सुविधा उपलब्ध नाहीत, असा आरोप पर्यावरण प्रेमी संघटनांनी केला आहे.

२०२० नंतर सध्या सर्वाधिक फ्लेमिंगो शहरात एनआरआय परिसरात आले आहेत. त्यांचे रंग, त्यांचे प्रणय नृत्य, त्यांच्या हालचाली हा आकर्षणाचा भाग आहे. महानगरपालिकेने या सुवर्णसंधीचा फायदा घेत आपल्या अधिकृत संकेतस्थळावर फ्लेमिंगोंबाबत माहिती, फोटो, त्यांना पाहण्याची ठिकाणे प्रसिद्ध करावीत.
- सुनील अग्रवाल, संचालक, सेव्ह नवी मुंबई एन्व्हायर्न्मेंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TVK MLA Ban: टीव्हीके आमदाराला विधानसभेत प्रवेश बंदी; विश्वासदर्शक ठरावापूर्वी विजय सरकारला मोठा धक्का

Pune Nasrapur Case : नसरापूर अत्याचार प्रकरण : चिमुरडीच्या शरीरावर गंभीर जखमा, आरोपीची तपासात उडवाउडवीची उत्तरे; पोलिसांचा न्यायालयात मोठा खुलासा

Latest Marathi News Live Update : नीट पेपर फूट प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी मूळचा अहिल्यानगरमधील, दुसरा आरोपी पुण्यातला

Sangli Police : सांगली पोलिसांचा संतापजनक प्रकार! संशयित समजून दोघा चुलत भावांना विवस्त्र करून बेदम मारहाण, आमदार जयंत पाटलांनी केली विचारपूस

Bibvewadi Fire : बिबवेवाडीत भीषण आगीत मंडप साहित्याचे गोदाम भस्मसात; दोन ट्रकसह सात दुचाकी खाक, मोठी जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT