मुंबई

अभियांत्रिकी विभागावर २०५ आक्षेप

CD

अभियांत्रिकी विभागावर २०५ आक्षेप
सहा महिन्यांच्या लेखापरीक्षणातील अहवाल सादर
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १२ : नवी मुंबई महापालिकेच्या ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ यादरम्यानचे लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आले आहेत. मंगळवारी (ता. १२) पार पडलेल्या स्थायी समितीच्या कामकाजात अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात ३६२ आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्यापैकी अभियांत्रिकी विभागावर २०५ आक्षेप नोंदवण्यात आल्याने लोकप्रतिनिधींनी आक्षेपांचा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितल्याने अखेर हे अहवाल दप्तरी दाखल करण्यात आले.
मुख्य लेखापरीक्षक राजेंद्र गाडेकर यांनी मागील सहा महिन्यांमध्ये झालेल्या विकासकामांचा लेखापरीक्षण अहवाल स्थायी समितीच्या पटलावर सादर केला. या अहवालात ३६२ आक्षेप व २५ सूचना नोंदवण्यात आल्या आहेत. लेखापरीक्षण विभागाने सादर केलेला हा अहवालातील आक्षेपाचा कधी अभ्यास करणार, असा प्रश्न लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. लेखापरीक्षण विभागाने विविध विभागांच्या कामावर घेतलेले आक्षेप पूर्ण करण्यासाठी काही मर्यादित कालावधी आहे का नाही, असा प्रश्न नगरसेवक जे. डी. सुतार यांनी उपस्थित केला. तर लेखापरीक्षण विभाग हे महापालिकेच्या कामकाजाचा आत्मा आहे. परीक्षण विभागाने केलेल्या कामानंतर आम्हाला हिशेब तपासता येणार आहे. तेव्हा प्रशासनाची पारदर्शकता स्पष्ट होणार आहे. तेव्हा वेळच्या वेळेवर लेखापरीक्षण अहवाल सादर करावा, अशी सूचना नगरसेवक सुधाकर सोनवणे यांनी केली. तसेच, जो विभाग एखाद्या कामाची निविदा तयार करतो. तोच तिच्यावर कार्यवाही करतो. अशा परिस्थितीत त्यांनी केलेल्या कामाचे परीक्षण कोण करणार, असा प्रश्नही सोनवणे यांनी उपस्थित केला. सदस्यांना अहवालाचा अभ्यास करण्यासाठी दर आठवड्याला लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याच्या सूचना नगरसेवक सागर नाईक यांनी केली. अखेर सदस्यांनी मांडलेल्या सूचनांमुळे हा अहवाल दप्तरी दाखल करण्याच्या सूचना सभापती अशोक पाटील यांनी दिल्या.

कोणत्या विभागावर किती आक्षेप
अग्निशमन विभाग - ३, अभियांत्रिकी विभाग - २०५, आपत्ती व्यवस्थापन विभाग - ३, आरोग्य विभाग - ४, उद्यान विभाग - २६, क्रीडा विभाग - ५, घनकचरा व्यवस्थापन - ४, निवडणूक विभाग - ३४, परवाना विभाग - ६, परिमंडळ १ विभाग - ८, परिमंडळ ३ विभाग - १, पाणी पुरवठा विभाग - १०, विद्युत विभाग - १९, शिक्षण मंडळ - २०, संगणक विभाग - १३, समाजविकास विभाग - १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT