मुंबई, ता. १२ : नवबालोद्यान संस्था संचलित साने गुरुजी इंग्लिश मीडियम स्कूलने २०२५-२६च्या दहावीच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवत १०० टक्के निकाल नोंदवला आहे.
परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळवून शाळेच्या शैक्षणिक दर्जाचा पुन्हा एकदा ठसा उमटवला. निकालानुसार, ९० टक्के व त्याहून अधिक गुण ३२ विद्यार्थ्यांनी, ८० टक्के व त्याहून अधिक ५ विद्यार्थ्यांनी, ७० टक्के व त्याहून अधिक ४० विद्यार्थ्यांनी, ६० टक्के व त्याहून अधिक २५ विद्यार्थ्यांनी, तर ५० टक्के व त्याहून अधिक ६ विद्यार्थ्यांनी मिळवले. ४० टक्क्यांखाली एकही विद्यार्थी नसणे, ही शाळेच्या नियोजनबद्ध मेहनतीची पावती आहे.
गुणवत्ता यादीतील विद्यार्थी :
भार्गवी कराळगीकर ९८.८० टक्के, आदित्य खरे ९७.२० टक्के, रिया गजणे ९६.६० टक्के, पिया जैन ९६.२० टक्के, आकृती हरेर ९६ टक्के, प्रतीक्षा सिंह ९६ टक्के.
शाळेच्या यशात शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची जिद्द आणि पालकांचा पाठिंबा असल्याचे शाळा व्यवस्थापनाने नमूद केले. विश्वस्त मंडळ, कार्यवाह मोहन मोहाडीकर, मुख्याध्यापिका सीमा शिंदे आणि सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. नवबालोद्यान संस्थेने साने गुरुजींच्या विचारांचा वारसा जपत शिक्षण क्षेत्रात आपला नावलौकिक पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.