खंडाळा घाटात अपघात; एक जखमी
खालापूर, ता. १२ (बातमीदार) ः पंढरपूरकडून मुंबईला जाणाऱ्या एसटीला एक दुचाकी धडकल्याची घटना खंडाळा घाटात मंगळवारी (ता. १२) घडली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला खोपोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुचाकी येऊन एसटी बसला धडकल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना खंडाळा घाटात दस्तुरी येथे मंगळवारी दुपारी ३.३० वाजता घडली. रोशन चव्हाण (वय २८, रा. पेडली, पाली) मंगळवारी दुपारी त्याची दुचाकी घेऊन लोणावळा दिशेने जात होता. मोबाईलवर बोलत असताना त्याचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या एसटीला जाऊन तो धडकला. एसटीचालकाने प्रसंगावधान राखून एसटी नियंत्रित केल्याने रोशन बचावला. रोशनच्या हातापायाला दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती स्थानिक दत्ता शेडगे यांनी वाहतूक पोलिसांना दिली; परंतु अर्धा तास उलटूनदेखील रुग्णवाहिका उपलब्ध झाली नव्हती. रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर जखमीला खोपोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघातामुळे खोळंबा झालेल्या प्रवाशांना पर्यायी एसटी उपलब्ध करून पुढे पाठवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.