मुंबई

रूपेरी पडद्याला मध्य रेल्वेची भुरळ!

CD

रुपेरी पडद्याला मध्य रेल्वेची भुरळ!
सीएसएमटी, आपटा, नेरळ, माथेरानला पसंती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मध्य रेल्वेच्या ऐतिहासिक, निसर्गरम्य आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थानकांना चित्रपटसृष्टीकडून मोठी पसंती मिळत असून, गेल्या तीन वर्षांत विविध चित्रपट, मालिका आणि वेबसीरिजच्या चित्रीकरणातून मध्य रेल्वेला तब्बल दोन कोटी २९ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. या कालावधीत सुमारे ३० चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण मध्य रेल्वेच्या विविध लोकेशन्सवर झाले.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे चित्रीकरणासाठी सर्वाधिक लोकप्रिय स्थळ ठरले आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील आपटा रेल्वे स्थानकानेही निर्माते-दिग्दर्शकांची विशेष पसंती मिळवली आहे. ग्रामीण पार्श्वभूमी, जुन्या धाटणीची स्थानक इमारत, आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर आणि सहज उपलब्धता यामुळे आपटा स्थानक चित्रपट निर्मात्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. पनवेल-रोहा मार्गावरील आपटा स्थानक मुंबईपासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर असल्याने चित्रीकरणासाठी आवश्यक तांत्रिक व लॉजिस्टिक सुविधा सहज उपलब्ध होतात. जुन्या काळातील रेल्वे वातावरण टिपण्यासाठी हे स्थानक विशेष उपयुक्त ठरत असल्याने अनेक कालखंडावर आधारित चित्रपटांचे येथे चित्रीकरण झाले आहे. मध्य रेल्वेच्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षांत मिळालेल्या एकूण महसुलापैकी ८५.५५ लाख रुपये म्हणजेच सुमारे ३७ टक्के महसूल एकट्या आपटा स्थानकातून प्राप्त झाला आहे. यावरून या स्थानकाची लोकप्रियता अधोरेखित होते.
...
निर्मात्यांसाठी स्वतंत्र जनसंपर्क कक्ष
मध्य रेल्वेच्या मार्गावरील नेरळ, माथेरान, लोणावळा, पनवेल, वाठार आणि सातारा ही स्थानकेही त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेमुळे आणि नयनरम्य परिसरामुळे चित्रीकरणासाठी पसंतीस उतरत आहेत. मध्य रेल्वेने चित्रपट निर्मात्यांसाठी स्वतंत्र जनसंपर्क कक्ष आणि एक खिडकी प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. सुरक्षा निकष, शुल्क आणि रेल्वे वाहतुकीच्या उपलब्ध स्लॉटनुसार परवानगी दिली जाते.
...
तीन वर्षांतील महसूल (लाख रुपये)
२०२३-२४ : ९४.४५
२०२४-२५ : ४०.१३
२०२५-२६ : ९४.६२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT