Sanjiv Bhagwat

 

sakal

मुंबई

संजीव भागवत ‘महर्षि नारद पत्रकार सन्मान’ पुरस्काराने सन्मानित

मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षि नारद पत्रकार पुरस्काराने ‘सकाळ’चे विशेष प्रतिनिधी संजीव भागवत यांचा सन्मान करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षि नारद पत्रकार पुरस्काराने ‘सकाळ’चे विशेष प्रतिनिधी संजीव भागवत यांचा सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट लेखनासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वांद्रे येथील नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या ॲम्फिथिएटरमध्ये आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक संदीप वासलेकर यांच्यासह निवृत्त लेफ्टनंट जनरल आर. आर. निंभोरकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रशांत पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

भारताची मूळ संस्कृती ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर आधारलेली आहे. जिथे संस्कृती आहे, तिथे संघर्ष असूच शकत नाही; मात्र जागतिक माध्यम समूहांकडून भारताचा हा सर्वसमावेशक विचार दडपण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन केले संदीप वासलेकर यांनी या वेळी केले.

भारताची सामरिक क्षमता अधिक बळकट झाली असून तिन्ही संरक्षण दले आजमितीला कुठल्याही आक्रमणाला तोंड देण्यासाठी सक्षम व सुसज्ज आहेत. भारताची शस्त्रास्त्र निर्यात आज ३० हजार कोटींच्या घरात पोहोचली असून देशाची संरक्षण सज्जता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे निवृत्त लेफ्टनंट जनरल आर. आर. निंभोरकर म्हणाले.

इतर पुरस्कार विजेते
पुरस्कार सोहळ्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण १२ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यात ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय मिलिंद बल्लाळ, जितेंद्र दीक्षित, डॉ. मयूर पारिख, राकेश त्रिवेदी, गौरीशंकर घाळे, मनश्री पाठक, सागरे देवरे, माणिक रेगे आणि आकाश दांडेकर यांचाही गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT