वाशीत नेपाळी व्यक्तीची आत्महत्या
नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : वाशीतील एनएमएसएच्या मैदानात एका नेपाळी व्यक्तीने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रूपबहादूर कुंवर (४३) असे या व्यक्तीचे नाव असून, त्याच्या आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट असले तरी, दारूच्या व्यसनाधीनतेमुळे त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
रूपबहादूर कुंवर हा मूळचा नेपाळचा होता. मात्र, कामानिमित्त तो नवी मुंबईत गेल्या काही वर्षांपासून राहात होता. रूपबहादूर याला दारूचे व्यसन जडल्याने गेल्या काही महिन्यांपासून तो मिळेल तिथे राहत होता. मंगळवारी (ता. १२) सकाळी ६ च्या सुमारास रूपबहादूर कुंवर हा वाशीतील एनएमएसएच्या मैदानात एका झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत तेथील सुरक्षा रक्षकांना आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. रूपबहादूरकडे याच्या ओळखीचा काहीच पुरावा नसल्याने नेपाळी नागरिकांच्या मदतीने त्याची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांकडे सोपविण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव रुपवते यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.