कडक उन्हात डांगराची शेती
कमी खर्चात अधिक उत्पादनाचा प्रयोग
वाणगाव, ता. १३ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील धुंदलवाडीत डांगर लागवडीचा यशस्वी प्रयोग झाला आहे. त्यामुळे बदलत्या हवामानात कमी खर्चात चांगले उत्पादनाचा नवा पर्याय शेतकऱ्यांना मिळाला आहे.
कृषी व्यवस्थापक ऋषिकेश खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक एकर क्षेत्रावर शास्त्रीय पद्धतीने डांगर लागवड करण्यात आली. या वेळी मल्चिंग, ठिबक सिंचन पद्धतीचा प्रभावी वापर करण्यात आला. कलिंगड काढणीनंतर बेडचा पुनर्वापर केल्यामुळे जमीन तयारी, मल्चिंग, ड्रिपचा अतिरिक्त खर्च वाचला. लागवडीपूर्वी सेंद्रिय खतांचा वापर करून माती भुसभुशीत ठेवण्यात आली. तसेच टप्प्यानुसार खत व्यवस्थापन करण्यात आले.
------------------
उत्पादन खर्चात बचत
कलिंगड पिकाच्या काढणीनंतर डांगरची लागवड करण्यात आली. त्यामुळे आधीच तयार ल्चिंग, ठिबक सिंचन व्यवस्था, तयार बेड यांचा पुनर्वापर करण्यात आला. यामुळे शेत तयार करणे, मल्चिंग, ड्रिपवरील मोठा खर्च वाचला आहे.
----------------------------
अपेक्षित उत्पन्न
या पिकाला होलसेल मार्केटमध्ये १० ते १२ रुपये प्रतिकिलो भाव मिळत असून, लागवडीतून प्रतिएकर अंदाजे १ ते १.२५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
------------------------
दुहेरी उत्पन्नाचा स्रोत
डांगर टिकाऊ फळभाजी असल्याने त्याची साठवण क्षमता विशेष मानली जाते. साधारण तीन महिन्यांपर्यंत फळ साठवून ठेवता येते. तसेच कोणत्याही अवस्थेत विक्री करता येते.
-------------------------
मुंबईसारखी मोठी बाजारपेठ जवळ असल्यामुळे उत्पादित मालाला विक्रीची उत्तम संधी मिळत आहे. उन्हाळी डांगर लागवडीचा प्रयोग कमी खर्चात अधिक उत्पादन देणारा पर्याय ठरत आहे.
-ऋषिकेश खिलारी, कृषी व्यवस्थापक, नरेशवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.