मुंबई

गुलमोहराचे आकर्षण !

CD

...अन् गुलमोहर फुलले
रखरखत्या उन्हात लाल फुलांचे आकर्षण

वाणगाव, ता. १३ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यासह डहाणू तालुक्यात सध्या गुलमोहरवर आलेला मनमोहक फुलोरा हा येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधत आहे. रस्त्याच्या कडेला सावली देणारं हे झाड वैशाखातल्या रणरणत्या उन्हातही फुलणारे वृक्ष आहे. लाल, केशरी अशा रंगाच्या छटांनी रस्त्याच्या दुतर्फा बहललेले ही झाडे रखरखत्या उन्हातही मनाला आल्हाद निर्माण करतात.

तसं पाहता, फेब्रुवारी-मार्चदरम्यान गुलमोहराची पाने गळायला सुरुवात होते, तर एप्रिल-मेच्या सुमारास पुन्हा झाडांना नवीन पालवी फुटते. कोवळी पाने गुलमोहराच्या सौंदर्यात भर टाकतात. लाल-केशरी पाकळ्यांवर पांढऱ्या-पिवळ्या रंगाच्या आकर्षक रेषा उमटतात, अन् त्यामुळे या फुलाचे सौंदर्य अधिकच खुलते. जुलै-ऑगस्टपर्यंत या वृक्षाचे सौंदर्य खुललेले असते. ५०-६० फूट उंचीपर्यंत वाढणारा गुलमोहर तिसऱ्या-चौथ्या वर्षांपासून बहरात येऊ लागतो. सामान्यत: गुलमोहराचे सरासरी आयुर्मान ४०-५० वर्षांचे असते. डहाणू तालुक्यात सध्या ठिकठिकाणी गुलमोहर बहरलेला दिसून येत आहे.

गुलमोहराच्या जमिनीवर येणारी मुळे बगिच्यांत बांधलेले रस्ते किंवा दगडी पायवाटा उखडून टाकू शकतो. अनेक वसाहतींच्या सभोवती, बागांमधून रंग उधळत गुलमोहराच्या पिळदार खोडांचे वृक्ष सध्या अनेक ठिकाणी उभे आहेत. गुलमोहरचे झाड फक्त आपल्याला सावली देत नाही, तर ते आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते.

-------------------
आरोग्यवर्धक गुलमोहर
गुलमोहर झाडाच्या खोडाची साल पावडर वापरून पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम देऊ शकते, गुलमोहरची पाने बारीक करून पावडर पाण्यात मिसळून नियमितपणे वापरल्याने केस गळती कमी होते, महिलांचा मासिक पाळीचा त्रास बरा होतो, तर तोंडातील अल्सर दूर करण्यासाठी गुलमोहरचा वापर करून झाडाच्या सालीच्या पावडरमध्ये मध मिसळून सेवन केले जाते. सांधेदुखी दूर करण्यासही हे झाड महत्त्वाचे आहे. मधुमेह विरोधी गुणधर्मांमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी गुलमोहर प्रभावी आहे. गुलमोहरची झाडे हवेतील विषारी वायू शोषून घेत, ऑक्सिजन सोडतात, ज्यामुळे हवा शुद्ध हवा मिळते, असे याचे गुण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT