मुंबई

बेळगावातील चोरीची कार ठाण्यातून जप्त

CD

ठाणे शहर, ता. १३ (बातमीदार) : कापूरबावडी वाहतूक पोलिसांनी धाडसी कारवाई करत चोरीची कार जप्त केली. बेळगाव येथून चोरी करून आणलेली ही कार ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी समयसूचकता दाखवत पाठलाग करून ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान संशयिताने पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

गोल्डन क्रॉस परिसरात रविवारी (ता. १०) ड्रंक अँड ड्राईव्हविरोधात नाकाबंदी सुरू होती. त्याच वेळी वाहतूक नियंत्रण कक्षाकडून कापूरबावडी वाहतूक विभागाला नवी मुंबई हद्दीतून चोरीची महागडी कार ठाण्याच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार अश्रू हाके, सहाय्यक निरीक्षक सागर सांगवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माजिवडा जंक्शन येथील गोल्डन क्रॉस परिसरात संशयित वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने भरधाव वेगाने घोडबंदर रोडच्या दिशेने पलायन केले. या घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखत एका डिलिव्हरी बॉयची दुचाकी घेत संशयिताचा पाठलाग केला. पोलिस अंमलदार अश्रू हाके यांनी सात ते आठ किलोमीटरपर्यंत पाठलाग करत आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. पाठलागादरम्यान आरोपीने वारंवार कार पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आरोपीने कार सोडून पळ काढला. तीन ते चार किलोमीटरपर्यंत पाठलाग केल्यानंतर आरोपी हाती आला; मात्र अंधाराचा फायदा घेत त्याने पलायन केले. पोलिसांनी जप्त केलेली चोरीची कार कापूरबावडी वाहतूक विभागात आणून कारमालक राहुल जाधव आणि बेळगाव पोलिसांनी ठाण्यात येऊन वाहनाची ओळख पटवली. पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर वाहन त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

अटल टनेलजवळ भीषण अपघात, बोगद्यातून बाहेर येताच स्कॉर्पिओ थेट नदीत बांधकाम सुरू असलेल्या पिलरवर लटकली, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT