मुंबई

खरेदीसाठी नागरिक मात्र सकारात्मक

CD

पंतप्रधानांच्या आवाहनाकडे नागरिकांची पाठ
अडचणीच्या काळात सोनेच आधार; खरेदीसाठी सकारात्मक
पनवेल, ता. १३ (बातमीदार) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने खरेदी करणे टाळावे, असे आवाहन देशवासीयांना केले, पण या आवाहनाकडे नागरिकांनी पाठ फिरवली असून, सोने खरेदीकडे कल वाढला आहे. कारण अडीअडचणीला घरातील सोनेच आधार ठरत असल्याची भावना ग्राहकांनी व्यक्त केली.
युध्दाच्या पार्श्वभूमीवर वर्षभर सोने खरेदी न करण्याच्या पंतप्रधानांचा निर्णय सर्वसामान्यांना रुचलेला नाही. सण-उत्सवांना खरेदी केलेले एक-दोन ग्रॅम सोन्याची पुंजी ही अडीअडचणीच्या काळात आधार ठरते. अर्ध्या रात्रीतही सोने मोडून पैसे उभे करता येतात. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित व लाभदायक असल्याचे सांगत सामान्यांनी खरेदीबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली आहे, तर सोन्याचे दागिने परिधान करणे हे प्रतिष्ठेचे लक्षण असल्याचे सांगत पनवेलच्या महिलावर्गाने सोने खरेदीला समर्थन दिले आहे. एकूणच पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतरही बाजारात सोने खरेदीला वेग आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले, पण काळानुरूप सोन्याच्या दरात वाढच होत असून, हक्काचा परतावा देणारी वस्तू आहे. शुभकार्याची शोभा वाढविणारे सोने हे गरज पडल्यास आधार ठरत असते.
- तृप्ती सूर्यवंशी, गृहिणी

सण-उत्सवावेळी सोने खरेदी करण्याची पद्धत कुटुंबात पूर्वापारपासून सुरू आहे. वाढत्या महागाईच्या काळातही ही पद्धत आम्ही जपली आहे. मध्यंतरीच्या काळात कुटुंबावर ओढावलेल्या वाईट प्रसंगावेळी हेच सोने आमच्यासाठी आशेचा किरण ठरले. त्यामुळे जशी बचत होईल सोने खरेदी करणार.
- नीलेश दिसले, नोकरदार

भारतीय संस्कृतीत सोने आणि महिला हे समीकरण दृढ झाले आहे. कुटुंबांच्या अडअडचणीवेळी हेच सोन्याचे दागिने उपयोगी पडतात. त्यामुळे महत्त्वाच्या सण-उत्सवांवेळी आर्थिक बजेट सांभाळून सोने खरेदी सुरुच ठेवणार आहे.
- सीमा पाटील, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT