मुंबई

नवी मुंबईच्या विकासकामांना गती

CD

नवी मुंबईच्या विकासकामांना गती
४६ कोटींच्या प्रस्तावांना स्थायी समितीची मंजुरी
वाशी, ता. १२ (बातमीदार) ः नवी मुंबई शहरातील पायाभूत सुविधा, शिक्षण व्यवस्था आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यासाठी ४६ कोटी पाच लाख एक हजार ६५६ रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली. पालिकेच्या स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरातील मूलभूत सेवांच्या सुधारणा प्रक्रियेला गती मिळेल, असा प्रशासनाचा दावा आहे.
या बैठकीत पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये घणसोली, कोपरखैरणे आणि वाशी परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरण व दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असून, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तुर्भे येथे नवीन आरसीसी नाल्याचे बांधकाम आणि बेलापूर विभागात संरक्षक भिंती उभारण्याच्या कामांनाही मंजुरी दिली आहे. पावसाळ्यातील पाणी निचरा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कामे महत्त्वाची मानली जात आहेत.
महापालिकेच्या महसूलवाढीसाठी जाहिरात हक्क आणि मालमत्ता व्यवस्थापनातून उत्पन्न वाढविण्यासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. आतापर्यंत जाहिरात शुल्कातून १२ कोटी ४५ लाख रुपयांचा महसूल जमा झाल्याची माहिती देण्यात आली असून १५ जूनपर्यंत नवी निविदा प्रक्रिया पूर्ण करून अधिक पारदर्शकता आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Petrol-Diesel Rate: RBI गव्हर्नरांच्या इशाऱ्यानंतर नवे दर जाहीर; पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT