मुंबई

मुंबईत उभारले जाणार तीन अत्याधुनिक कर्करोग रुग्णालये

CD

मुंबईत उभारली जाणार तीन अत्याधुनिक कर्करोग रुग्णालये
२०३० पर्यंत रोबोटिक शस्त्रक्रिया सुविधेचा विस्तार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईत वाढत्या कर्करोग रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने मोठी पावले उचलली आहेत. पुढील चार वर्षांत शहरात तीन अत्याधुनिक कर्करोग रुग्णालये उभारण्याची तयारी सुरू असून, २०३० पर्यंत प्रमुख शासकीय रुग्णालयांत रोबोटिक शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सध्या कर्करोग उपचारांसाठी मुंबईसह देशभरातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर टाटा मेमोरियल रुग्णालयात दाखल होतात. मात्र, वाढती रुग्णसंख्या आणि प्रतीक्षा यादीमुळे नवीन सार्वजनिक कर्करोग रुग्णालयांची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत होती. या पार्श्वभूमीवर सायन, नायर आणि जे. जे. रुग्णालय परिसरात स्वतंत्र कर्करोग रुग्णालये उभारण्याची योजना वेगाने पुढे सरकत आहे. तज्ज्ञांच्या मते, कर्करोगाच्या रुग्णांत सातत्याने वाढ होत असताना परवडणाऱ्या दरातील उपचार सुविधा मर्यादित असल्याने अनेक रुग्णांना उपचारासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे.
लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय अर्थात सायन रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात १३ मजली स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारले जाणार आहे. या रुग्णालयात २०० खाटा असतील. रेडिओथेरपी, किमोथेरपी, पीईटी-सीटी स्कॅन यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून, शासकीय योजनांअंतर्गत रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार दिले जाणार आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेने २०३० पर्यंत प्रमुख रुग्णालयांत रोबोटिक शस्त्रक्रिया सुविधा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या केईएम रुग्णालयातील अस्थिरोग विभागात ही सुविधा उपलब्ध असून, आगामी काळात सायन, नायर आणि कूपर रुग्णालयातही ती सुरू करण्याची तयारी आहे.

‘नायर’मधील काम अंतिम टपप्यात
नायर रुग्णालयातील सात मजली व्यापक कर्करोग केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून, २०२७ पासून ते कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. येथे दररोज २०० ते २५० रुग्णांवर उपचार आणि ८ ते १० पीईटी-सीटी स्कॅन होऊ शकतील, अशी क्षमता विकसित करण्यात येत आहे.

११ एकर जागेची मागणी
जे. जे. रुग्णालयात सर्व विभागांमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया विस्तारण्याचे नियोजन सुरू आहे. राज्य सरकारकडून जे. जे. रुग्णालयाजवळ २०० पेक्षा अधिक खाटांचे कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी रिचर्डसन अँड क्रुडासच्या ११ एकर जागेची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Petrol-Diesel Rate: RBI गव्हर्नरांच्या इशाऱ्यानंतर नवे दर जाहीर; पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT