गीता तटकरे नर्सिंग कॉलेजमध्ये परिचारिका दिन उत्साहात
माणगाव, ता. १३ (वार्ताहर) : माणगावातील श्रीमती गीता दत्तात्रय तटकरे कॉलेज ऑफ नर्सिंग येथे मंगळवारी (ता. १२) आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आरोग्य सेवेत अहोरात्र कार्यरत राहून मानवतेची सेवा करणाऱ्या परिचारिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमाला सदस्य डॉ. हेमंत गांधी, औदुंबर गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अरुण पोवार, मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएसई शाळेच्या प्राचार्या निशिगंधा मयेकर, अशोकदादा साबळे विधी कॉलेजच्या प्राचार्या सोनाली बुर्टे, सुधाकर नारायण शिपूरकर इंग्लिश मीडियम शाळेच्या प्राचार्या मनीषा मोरे तसेच द. ग. तटकरे कॉलेजचे प्राचार्य जयशंकर पांडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांना परिचारिकांचे आरोग्य व्यवस्थेतील अमूल्य योगदान, रुग्णसेवेमधील त्यांचा त्याग, समर्पण आणि सेवाभाव याबाबत मार्गदर्शन केले. परिचारिका या केवळ आरोग्यसेवक नसून त्या रुग्णांसाठी आशेचा किरण असतात, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.
कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांसाठी पोस्टरनिर्मिती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली सर्जनशीलता आणि कौशल्य सादर केले. विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवचिन्ह व बक्षिसे प्रदान करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.